Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘समुद्र प्रचेत’ स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज जीएसएलद्वारे जलावतरण Water distribution by ‘Samadru Prachet’ indigenous pollution control vessel GS

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2025
  • July 2025
  • ‘समुद्र प्रचेत’ स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज जीएसएलद्वारे जलावतरण Water distribution by ‘Samadru Prachet’ indigenous pollution control vessel GS
'Sea-wise' indigenous pollution By control ship GSL water supply

● गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रमाने भारतीय तटरक्षक दल (ICG) साठी डिझाइन केलेल्या दुसऱ्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचे (PCV), 23 जुलै, 2025 रोजी, गोव्‍यातील वास्को-द-गामा येथील शिपयार्डमध्ये जलावतरण केले.
● 72% स्वदेशी घटकांसह, प्रकल्पाने GSL आणि त्याच्या विस्तारित पुरवठा साखळीमध्ये उत्पादन क्रियाकलापांशी संबंधित स्थानिक उद्योग आणि MSME च्या सक्रिय सहभागाद्वारे राष्ट्रीय क्षमता उभारणी, रोजगार निर्मिती आणि कौशल्य वृद्धीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
● संपूर्णपणे GSLमध्येच डिझाइन आणि बांधणी केलेले हे जहाज भारतीय तटरक्षक दलाच्या परिचालनाच्या विशिष्ट गरजांची पूर्तता करू शकेल अशा पद्धतीनेच तयार केले गेले आहे.
● 114.5 मीटर लांबी, 16.5 मीटर रुंदी आणि 4,170 टन विस्थापन क्षमता हे असलेले जहाज 14 अधिकारी आणि 115 खलाशी यांच्या सहाय्याने चालवले जाईल.
● त्याच्या दोन बाजूंना स्वीपिंग आर्म्स बसवण्यात आले असल्याने ते मार्गक्रमण करत असताना गळतीमुळे पाण्यावर पसरलेले तेल गोळा करू शकते, तसेच त्यावरील आधुनिक रडार प्रणालीने ते तेलगळती कुठून होत आहे हे देखील शोधू शकते.
● हे जहाज पाण्यावर पसरलेला तेलाचा तवंग पूर्णपणे हटवू शकेल, दूषित झालेले पाणी पंप करून त्यातील प्रदूषकांचे पृथक्करण करून ते विलग करू शकेल तसेच पाण्यावरून गोळा केलेले तेल जहाजावर त्यासाठी असलेल्या खास टाक्यांमध्ये साठवू शकेल अशा पद्धतीने डिझाइन केले आहे.
● समुद्र प्रचेत नावाचे हे दोन प्रदूषण नियंत्रण जहाजांच्या मालिकेतील दुसरे जहाज आहे.
● समुद्र प्रताप (यार्ड 1267) या पहिल्या जहाजाचे 29 ऑगस्ट, 2024 रोजी अनावरण करण्यात आले होते.
● हीच परंपरा पुढे सुरू ठेवत, शिपयार्डमध्ये झालेल्या कार्यक्रमात समुद्र प्रचेतचे प्रिया परमेश यांच्या हस्ते समारंभपूर्वक जलावतरण करण्यात आले.
● भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवामणी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *