भारत सरकार, आसाम सरकार आणि युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (ULFA) यांच्यात त्रिपक्षीय शांतता करार करण्यात आला आहे. 40 वर्षांत पहिल्यांदाच सशस्त्र अतिरेकी संघटन उल्फाचा भारत आणि आसाम सरकारशी पहिल्यांदाच शांतता करार झाला आहे. ज्यावर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर संबंधितांनी स्वाक्षरी केली.
अधिक माहिती
• ईशान्य भारतात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले जाते.
• उल्फाकडून गेली अनेक वर्ष सशस्त्र उठाव केला जात होता. त्यामुळे सुरक्षा दल आणि उल्फा बंडखोरांमध्ये अनेकदा हिंसक संघर्ष पेटलेला पाहायला मिळायचा.
• दिल्ली येथे झालेल्या बैठकीत सदर शांतता करार करण्यात आला. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा, गृह सचिव अजय भल्ला, आसामचे पोलिस महासंचालक जीपी सिंह यांच्यासह उल्फा समूहाचे सदस्य उपस्थित होते.
• परेश बरुआ यांच्या नेतृत्वाखालील उल्फा गट या सामंजस्य करारात सहभागी झालेला नाही.
• आसामला स्वायत्तता मिळावी या मागणीसाठी 1979 मध्ये ‘उल्फा’ ची स्थापना करण्यात आली.