आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पडणारे भारताचे बॅडमिंटन मधील जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणारा सर्वोच्च मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
• महाराष्ट्राचे आदिती स्वामी आणि ओजस देवताळे, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्यासह 26 क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
• प्रज्ञांनंदसह अनेक बुद्धिबळपटूंना घडविणारे प्रशिक्षक आरबी रमेश यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
• दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणजेच 29 ऑगस्टला या पुरस्कारांचे वितरण केले जाते. मात्र यावेळी 9 जानेवारीला राष्ट्रपती भवन येथे होणाऱ्या विशेष सोहळ्यात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते या क्रिडापटूंचा गौरव केला जाणार आहे.
• सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीनुसार हे पुरस्कार निश्चित करण्यात आले आहेत.
मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार
• चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी बॅडमिंटन
द्रोणाचार्य: (नियमित)
• ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), महावीर प्रसाद सैनी (प्यारा एथलेटिक्स) , शिवेंद्र सिंह (हॉकी ), गणेश देवरुखकर (मल्लखांब)
द्रोणाचार्य (जीवनगौरव)
• जसकीरत सिंग ग्रेवाल (गोल्फ), भास्करन ई (कबड्डी), जयंता कुमार पुशिलाल (टेबल टेनिस)
मेजर ध्यानचंद जीवनगौरव
• मंजुषा कनवर (बॅडमिंटन), विनीत कुमार शर्मा (हॉकी), कविता सेल्वराज (कबड्डी)
अर्जुन पुरस्कार
• ओजस देवताळे, आदिती स्वामी (तिरंदाजी), मुरली श्रीशंकर, पारुल चौधरी (एथलेटिक्स), मोहम्मद हूसामुद्दीन (बॉक्सिंग), आर. वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाल, दिव्याक्रीती सिंग (घोडेस्वारी), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्णबहादूर, सुशीला चानू (हॉकी), पवन कुमार, रितू नेगी (कबड्डी), नसरीन (खो-खो), पिंकी (लॉन बॉल्स), ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर, ईशा सिंह (नेमबाजी), हरिंदर पालसिंग संधू (स्क्वाश), आहीका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार (कुस्ती), नौरेम रोशिबिनी देवी (प्यारा तिरंदाजी), इलुरी रेड्डी (आंध्र क्रिकेट), प्राची यादव (प्यारा कनोईंग).