सिंगापूरचे अध्यक्षपदी भारतीय वंशाचे तर्मन षणमुगारत्नम यांची निवड करण्यात आली. अर्थतज्ञ असलेले षणमुगारत्नम यांनी अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत 70 टक्के होऊन अधिक मते मिळवली. सिंगापूरचे अध्यक्षपदी भारतीय वंशाची व्यक्ती विराजमान होण्याची ही तिसरी वेळ आहे.
थर्मन षणमुगररत्नम :-
(जन्म 25 फेब्रुवारी 1957)
हे सिंगापूरचे राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ आहेत. जे सिंगापूरचे निर्वाचित अध्यक्ष आहेत. त्यांनी यापूर्वी 2019 ते 2023 दरम्यान सिंगापूरचे वरिष्ठ मंत्री आणि 2015 ते 2023 दरम्यान सामाजिक धोरणांचे समन्वयक मंत्री आणि 2011 ते 2023 दरम्यान सिंगापूरच्या चलन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. पीपल्स अॅक्शन पार्टीचे ते नेते आहेत. त्यांनी उपपंतप्रधान म्हणूनही काम केले.(2011 ते 2019 ) 2007 ते 2015 दरम्यान अर्थमंत्री , 2003 ते 2008 दरम्यान शिक्षण मंत्री .होते.


