Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

सी-डॉट ने जिंकला संयुक्त राष्ट्रांचा WSIS 2024 “चॅम्पियन” पुरस्कार

  • Home
  • Current Affairs
  • सी-डॉट ने जिंकला संयुक्त राष्ट्रांचा WSIS 2024 “चॅम्पियन” पुरस्कार
  • सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सी-डॉट) या भारत सरकारच्या प्रमुख दूरसंचार संशोधन आणि विकास केंद्राला, संयुक्त राष्ट्राचा WSIS 2024 “मोबाइल–एनेबल्ड डिझास्टर रेझिलिअन्स थ्रू सेल ब्रॉडकास्ट इमर्जन्सी अलर्र्टिंग” या श्रेणीतील प्रकल्पासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
  • इंटरनॅशनल टेलिकॉम युनियन (ITU) द्वारे स्वित्झर्लंड मधील जिनेव्हा येथे 27 मे ते 31 मे 2024 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड समिट द इन्फॉर्मेशन सोसायटी (WSIS)+20 फोरम 2024,  या जागतिक शिखर परिषदेने सी-डॉट च्या सेल ब्रॉडकास्ट आपत्कालीन इशारा मंच  प्रकल्पाला मान्यता दिली.
  • डब्ल्यूएसआयएस परिणामांच्या अंमलबजावणीला बळकटी देण्यात उत्कृष्ट योगदानासाठी तसेच सामाजिक प्रभावासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी सी-डॉट ची वचनबद्धता अधोरेखित करण्यासाठी ब्रॉडकास्ट आपत्कालीन इशारा मंचाला मान्यता देण्यात आली.
  • डब्ल्यूएसआयएस च्या सोबतीने जिनिव्हा येथे उत्कर्षासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता जागतिक शिखर परिषद 29 मे ते 31 मे, 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
  • हे व्यासपीठ आरोग्य, हवामान, लिंग समानता , सर्वसमावेशक समृद्धी, शाश्वत पायाभूत सुविधांच्या प्रगतीसाठी आणि इतर जागतिक विकास प्राधान्यक्रमांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रचार करणारे संयुक्त राष्ट्रांचे क्रियाभिमुख अग्रगण्य व्यासपीठ आहे.
  • या कार्यक्रमात सी-डॉट ने ITU – CAP आधारित अत्याधुनिक दूरसंचार उपायांचे  प्रदर्शन केले.
  • आपत्ती व्यवस्थापनासाठी सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञान आणि सायबर फसवणूकीमध्ये वापरलेले सिम शोधण्यासाठी ASTR (टेलिकॉम सिम सब्सक्राइबर व्हेरिफिकेशनसाठी एआय आणि फेशियल रिकग्निशन पॉवर्ड सोल्यूशन) यांचा समावेश आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *