Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार

सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार

आर .अश्विन ची निवृत्तीची घोषणा

  • भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली.
  • सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे.
  • ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी कसोटी अखेरच्या दिवशी अनिर्णित राहिल्यानंतर 38 वर्षे अश्विनने निवृत्तीची घोषणा केली .
  • शेवटचा सामना त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन या ठिकाणी खेळला.
  • भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळे (629 )यांच्यानंतर अश्विनचा (537) क्रमांक लागतो.

अश्विनच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे

  • रविचंद्रन अश्विन याने कसोटी क्रिकेटमधील एका डावात 37 वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.
  • एका डावात पाच किंवा जास्त फलंदाज बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो शेन वॉर्न याच्यासह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे.
  • मुथय्या मुरलीधरन याने 67 वेळा अशी कामगिरी केली आहे.
  • अश्विनने 537 पैकी 383फलंदाज हे मायदेशात बाद केले आहेत.
  • मायदेशात सर्वाधिक कसोटी फलंदाज बाद करणारा तो मुथय्या मुरलीधरन (493), जेम्स अँडरसन (438) व स्टुअर्ट ब्रॉड (398) यांच्यानंतर चौथा गोलंदाज ठरला आहे.

अष्टपैलू अश्विनचा पराक्रम

  • अश्विनने कसोटीत 3503 धावा केल्या असून 537 विकेटही मिळवल्या आहेत.
  • अशी कामगिरी करणारा तो शेन वॉर्न व स्टुअर्ट ब्रॉडनंतरचा तिसरा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे.
  • अश्विनने एका कसोटीत शतक व पाच विकेट मिळवण्याची किमया केली आहे. असे प्रदर्शन त्याने चार वेळा केले आहे. इयान बॉथम यांनी पाच वेळा अशी कामगिरी केली होती.
  • अश्विनने कसोटीत अकरा वेळा मालिकावीराचा मान संपादन केला आहे. सर्वाधिक मालिकावीर पटकावणाऱ्या यादीत मुथय्या मुरलीधरन याच्यासोबत तो पहिल्या स्थानावर आहे.

प्रतिष्ठेच्या स्पर्धांचे विजेतेपद:

  • 2011 एकदिवसीय विश्व चषक
  • 2013 चॅम्पियन्स करंडक
  • 2010 व 2016 मध्ये आशियाई स्पर्धा

कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट मिळवणारे गोलंदाज

1) मुथय्या मुरलीधरन – 133 सामने 800 विकेट

2) शेन वॉर्न – 145 सामने 708 विकेट

3) जेम्स अँडरसन – 188 सामने 704 विकेट

4) अनिल कुंबळे – 132 सामने 619विकेट

5) स्टुअर्ट ब्रॉड – 167सामने 604 विकेट

6) ग्लेन मॅग्रा – 124 सामने 563 विकेट

7) रवीचंद्रन अश्विन 106 सामने 537 विकेट

अश्विनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

  • कसोटी: सामने :106, विकेट :537, धावा : 3503 ,शतक:6, अर्धशतक : 14
  • एकदिवसीय: सामने: 116, बळी: 156 , धावा: 707, अर्धशतक: 1
  • टी- 20 : सामने: 65, विकेट: 72, धावा: 184
  • तीनही प्रकारात एकूण धावा : 4394
  • एकूण सामने: 287
  • एकूण विकेट : 765
  • शतक : 6
  • एकदिवसीय पदार्पण: 5 जून 2010 वि.श्रीलंका
  • टी -20 पदार्पण : 12 जून 2010 वि.झिम्बाब्वे
  • कसोटी पदार्पण : 6 नोव्हेंबर 2011 वि. वेस्टइंडीज
  • जर्सी नंबर : 99
  • अश्विन च्या पुस्तकाचे नाव : आय हॅव द स्ट्रीट: अ कुट्टी क्रिकेट स्टोरी

सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार

  • ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ, हिंदी कवी गगन गिल, इंग्रजी लेखक इस्टीरीन किरे यांच्यासह 21 जणांना साहित्य अकादमी पुरस्कार  जाहीर झाले.
  • अकादमीच्या निवड समिती सदस्यांनी 21 भाषांमध्ये हे सन्मान जाहीर केले.
  • यंदा ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला.
  • रसाळ हे स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यविश्वातील एक व्यासंगी व परखड समीक्षक म्हणून ओळखले जातात.
  • डॉ. सुधीर नरहर रसाळ हे मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक आहेत.
  • त्यांनी दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे.
  • इ .स. 1956 पासून ते मराठी वाङ्मयाची समीक्षा करीत आहेत.
  • साहित्यविषयक लेखन, समीक्षा लेखन आणि संपादनात त्यांचा हातखंडा आहे.
  • रसाळ हे सन 1990 ते 1993 या काळात औरंगाबाद विद्यापीठाच्‍या मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे प्रमुख होते.

ग्रंथसंपदा

  • कविता आणि प्रतिमा
  • कवितानिरूपणे
  • काही मराठी कवी : जाणिवा आणि शैली
  • ना.घ. देशपांडे यांची कविता
  • मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्‍लेषण
  • मर्ढेकरांची कविता : जाणिवांचे अंतःस्‍वरूप
  • मर्ढेकरांचे कथात्‍म आणि नाट्यात्‍म वाङ्मय
  • लोभस : एक गाव काही माणसंं (व्‍यक्तिचित्रे)
  • वाङ्मयीन संस्कृती
  • समीक्षक भालचंद्र नेमाडे
  • साहित्य अध्यापन आणि प्रकार : सहसंपादन (प्रा. वा. ल. कुलकर्णी गौरवग्रंथ)
  • रसाळ सरांच्या ‘नव्या वाटा शोधणारे कवी’ हे पुस्तक नुकतचं प्रकाशित झाले.

पुरस्कार  मानसन्मान

  • अशोक कीर्तकीर पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार
  • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्यातर्फे दिला जाणारा गौरवमूर्ती पुरस्कार
  • चारठाणकर प्रतिष्ठानचा पुरस्कार
  • मराठवाडा साहित्य परिषदेचा 1 ला जीवनगौरव पुरस्कार
  • प्रा. रा.श्री. जोग पुरस्कार
  • पद्मजा बर्वे पुरस्कार
  • वाटा कवितेच्या’ कार्यक्रमात दिला जाणारा, परभणीच्या शब्द सह्याद्री प्रतिष्ठानचा २०१४ सालचा शब्द सह्याद्री साहित्य सन्मान
  • साहित्य समीक्षा पुरस्कार
  • अशोक केळकर मराठी-भाषा-अभ्यासक पुरस्कार (२०२१)
  • ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी २०२४ चा साहित्य अकादमी पुरस्कार
  • रसाळ कुटुंब मूळचे गांधेलीचे. (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) त्यांच्या वडिलांकडे या गावची पाटीलकी व कुळकर्णीकी होती.
  • सुधीर रसाळ यांचा जन्म १० ऑगस्ट १९३४ रोजी वैजापुरात झाला.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्याचा योगही त्यांना आला.
  • शासकीय कला महाविद्यालय व त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी भाषेचे अध्यापन त्यांनी केले.
  • त्यांना समीक्षेसाठी अनेक नामवंत पुरस्कार मिळाले आहेत. यात आता साहित्य अकादमी या मानाच्या पुरस्काराची भर पडली आहे.
  • डॉ. सुधीर रसाळ यांचे शालेय शिक्षण छत्रपती संभाजीनगरातील सरस्वती भुवन येथे तर महाविद्यालयीन शिक्षण मिलिंद महाविद्यालयात झाले.
  • तर त्यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून मराठी विषयात एम.ए. ची पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली.
  • त्यानंतर  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘आधुनिक मराठी काव्यातील प्रतिमासृष्टी’ या विषयात त्यांना पीएच. डी. पदवी प्रदान केली. त्यानंतर त्यांनी तब्बल ३७ वर्ष अध्यापन क्षेत्रात सेवा दिली.
  • छत्रपती संभाजीनगर येथील गव्हन्मेंट आर्टस् अँड सायन्स कॉलेज येथे तीन वर्ष अधिव्याख्याता तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मराठी विभागात येथे अधिव्याख्याता, प्राध्यापक आणि विभागप्रमुख या पदांवर तब्बल ३४ वर्ष कार्यरत राहत मराठी भाषेचे अध्यापन केले.

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते:

  • मराठी –  सुधीर रसाळ
  • मल्याळम – जयकुमार
  • आसामी- समीर तांती
  • मणिपूरी -हाओबम सत्यवती देवी
  • बोडो -अरोन राजा
  • नेपाळी – युवा बराल
  • इंग्लिश -इस्टरिन किर
  • ओडिया- वैष्णव चरण समल
  • गुजराती -दिलीप झवेरी
  • पंजाबी – पॉल कौर
  • हिंदी – गगन गिल
  • राजस्थानी – मुकुट मनिराज
  • कन्नड -केव्ही नारायणा
  • संस्कृत -दीपक कुमार शर्मा
  • काश्मिरी-  सोहन कौल
  • सैंतली -महेश्वर सोरेन
  • कोंकणी – मुकेश थाली
  • सिंधी -हुंदराज बलवानी
  • मैथिली – महेंद्र मलांगिया
  • तामिळ -एआर व्यंकटचलपथी
  • तेलुगु – पेनुगौंडा लक्ष्मीनारायण

साहित्य अकादमी पुरस्कार

  • साहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या २४ भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होते. एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • सुरवात : 1955
  • भारतातला पहिला साहित्य अकादमी पुरस्कार 1955 मध्ये देण्यात आला होता. मराठीसाठी हा पुरस्कार पहिल्यांदा 1955 मध्येच देण्यात आला होता. या पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या वैदिक संस्कृतीचा विकास या पुस्तकासाठी मिळाला होता
  • हा पुरस्कार साहित्य अकादमीतर्फे दरवर्षी देण्यात येतो.
  • दरवर्षी अकादमी तर्फे मान्यता देण्यात येणाऱ्या भाषेतील 24 कलाकृतींना पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
  • यात संविधानातील 22 भाषांसहित इंग्रजी आणि राजस्थानी या दोन भाषांचा समावेश होतो.
  • ज्ञानपीठ पुरस्कारानंतर साहित्य अकादमी पुरस्कार हा भारत सरकारचा द्वितीय सर्वोच्च साहित्य सन्मान आहे.
  • स्वरूप : एक लाख रुपये, ताम्रपत्र ,शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे .
  • खालील २४ भारतीय भाषांमधील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो : आसामी, इंग्रजी, उर्दू, उडिया, कन्नड, काश्मिरी, कोकणी, गुजराती, डोग्री, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मणिपुरी, मराठी, मल्याळम, मैथिली, राजस्थानी, संथाळी, संस्कृत, सिंधी व हिंदी.
  • साहित्य अकादमी चे अध्यक्ष: माधव कौशिक

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *