चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि इ मॅगेझिन तर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा जाहीर झाला आहे.
● सभागृहातील उपस्थिती, उपस्थित केलेले जनहिताचे प्रश्न, चर्चेतील सहभागासाठी, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
● दिल्ली येथे 17 फेब्रुवारी 2024 रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
● माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.
● 17 व्या लोकसभेत सुळे यांनी कामगिरीतील सातत्य कायम असून, पाच डिसेंबर पर्यंत त्यांनी 94% उपस्थिती लावली आणि 231 चर्चासत्रांत भाग घेतला आहे.
● सभागृहात त्यांनी आतापर्यंत 587 प्रश्न विचारले असून 16 खासगी विधेयके मांडले आहेत.
● या कामगिरीसाठी त्यांना पुन्हा एकदा संसद महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे, तर याच संस्थेचा संसदरत्न पुरस्कार त्यांना सात वेळा प्रदान करण्यात आला आहे.
● यापूर्वी त्यांना 16 व्या लोकसभेतील संसद महारत्न पुरस्कार देण्यात आला होता.