अयोध्येतील सोहळा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत परत येत ‘पंतप्रधान सूर्योदय योजने’ची घोषणा केली. या योजनेअंतर्गत एक कोटी घरांच्या छतांवर सौर यंत्रणा बसविली जाणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीजबिल कमी होण्याबरोबरच ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होईल.


