‘सेबी’च्या अध्यक्षपदी तुहिन कांता पांडे यांची निवड
- देशाचे विद्यमान वित्त आणि महसूल सचिव म्हणून कार्यरत असलेले तुहिन कांता पांडे यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी भांडवली बाजाराची नियंत्रक असलेल्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड अर्थात ‘सेबी’च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली
- भारतीय प्रशासकीय सेवेतील ओडिशाच्या 1987 च्या तुकडीतील अधिकारी पांडे हे मावळत्या ‘सेबी’ अध्यक्ष माधवी पुरी बुच यांची जागा घेतील.
- बुच यांचा ‘सेबी’ प्रमुख म्हणून कार्यकाळ 28 फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला आहे.
- गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग सचिव म्हणून काम करणाऱ्या पांडे यांची यावर्षी जानेवारीमध्ये अर्थसंकल्प 2025-26 च्या आधी महसूल सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
- तुहिन कांत पांडे यांनी याआधी युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (UNIDO) च्या प्रादेशिक कार्यालयात देखील काम पाहिलेले आहे. तसेच पांडे हे कॅबिनेट सचिवालयात सहसचिव आणि वाणिज्य मंत्रालयात उपसचिव होते.
- या बरोबरच ओडिशा सरकारमध्ये पांडे यांनी आरोग्य सामान्य प्रशासन, व्यावसायिक कर, वाहतूक आणि वित्त विभागांमध्ये देखील प्रमुख पदांवर काम केलेलं आहे.
- एअर इंडियाचे खासगीकरण, नीलांचल इस्पात आणि LIC च्या आयपीओमध्ये ओडिशाचे रहिवासी असलेल्या तुहिन पांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
- 2021 मध्ये त्यांनी काही काळ नागरी हवाई वाहतूक मंत्रालयात सचिव म्हणूनही काम पाहिले. याच काळात TATA समूहाला एअर इंडिया विकण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
- पांडे यांनी पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी परदेशातील बर्मिंगहॅम विद्यापीठातून MBA केले.
सेबी(SEBI)
- सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ही भारत सरकारने स्थापन केलेली एक वैधानिक नियामक संस्था आहे. सेबीचे काम शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि इतर वित्तीय संस्थांचे नियमन करणे हे आहे.
- तसेच सेबी, सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करते.
- सेबीची स्थापना : 12 एप्रिल 1988
- 1992 मध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया कायदा लागू झाल्यानंतर सेबी ही वैधानिक संस्था बनली.
- सेबी, वित्त मंत्रालयाच्या प्रशासकीय क्षेत्रात येते.