सोनमर्ग बोगद्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
- काश्मीरखोरे आणि लडाखमधील दळणवळण कोणत्याही ऋतुत सुरू ठेवणाऱ्या ‘झेड-मोढ’ बोगद्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
- काश्मीरमधीलप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या सोनमर्गमध्ये हा बोगदा आहे.
- उद्घाटनसोहळ्याला जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आदी उपस्थित होते.
बोगद्याची वैशिष्ट्ये:
- मध्यकाश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगिर आणि सोनमर्ग दरम्यानचा हा बोगदा4 किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी 2700 कोटी रुपये खर्च आला.
- बोगदादुपदरी असून आपत्कालीन परिस्थितीसाठी त्याला समांतर असा5 मीटर लांबीचा मार्ग बांधण्यात आला आहे.
- हाबोगदा समुद्रसपाटीपासून 8,650फूट उंचावर असून, तो सर्व हवामानात कार्यरत असेल.
- मुख्यम्हणजे भूस्खलन आणि हिमस्खलन होणाऱ्या मार्गाला हा बोगदा वळसा घालून जाईल.
- याबोगद्यामुळे काश्मीर खोरे आणि लडाखमधील अंतर सहा किलोमीटरने कमी होतानाच वाहनाचा ताशी वेग 30 किलोमीटरवरून ताशी 70 किलोमीटर इतका वाढणार आहे.
मंद वाहतुकीत महाराष्ट्रातील पुणे जगात चौथ्या स्थानावर
- वाहतुकीचावेग मंदावलेल्या शहरांमध्ये पुणे जगात चौथ्या क्रमांकावर आहे, असे ‘टॉमटॉम’ या संस्थेच्या वाहतूक कोंडी अभ्यासात म्हटले आहे.
- पुण्यातीलवाहनचालकांना दहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा अधिक कालावधी लागत असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.
- ‘टॉमटॉम’ हीसंस्था दर वर्षी जगातील वाहतुकीचा अभ्यास करते.
- सन2024 च्या अहवालानुसार, कोलंबियातील बरानकिला हे सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेले शहर ठरले आहे.
- त्यानंतरदुसऱ्या क्रमांकावर भारतातील कोलकाता, तिसऱ्या क्रमांकावर बंगळुरू आणि चौथ्या क्रमांकावर पुणे आहे.
- गेल्यावर्षभरातील वाढते नागरीकरण, वाहनांची वाढती संख्या, अरुंद रस्ते, मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण, नियोजनाचा अभाव आदी प्रमुख कारणे या शहरांमधील वाहतुकीचा वेग मंदावण्यास कारणीभूत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जागतिक भूगोल दिन
- जागतिकभूगोल दिन दरवर्षी 14 जानेवारीला साजरा केला जातो. हा दिवस भूगोल महर्षी सी.डी. देशपांडे यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
- भूगोलदिन साजरा करण्यामागचे उद्देश: भूगोलाबद्दल लोकांमध्ये असलेली भीती दूर करणे, भूगोलाचे महत्त्व लोकांना समजावणे.
- भूगोलहा एक शास्त्र आहे. भूगोलाच्या दोन मुख्य उपशाखा आहेत: मानवी भूगोल, भौतिक किंवा प्राकृतिक भूगोल.
- भूगोलाचेजनक इराटोस्थेनिस ऑफ सायरेन होते. ते प्राचीन ग्रीक विद्वान होते.
निलगिरी, सुरत आणि वागशीर या तीन लढाऊ ताफा भारतीय नौदलात सामील होण्यास सज्ज
- 15 जानेवारी25 हा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. कारण, या दिवशी भारतीय नौदल तीन आघाडीच्या लढाऊ जहाजांना नौदलात नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे एकाच कार्यक्रमात नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेण्याचे निश्चित केले आहे.
- ताफ्यातसामील होणारी पुढील प्रमाणे आहेत – निलगिरी, हे प्रोजेक्ट 17A स्टेल्थ फ्रिगेट अर्थात विनाशिका श्रेणीतील प्रमुख जहाज; सुरत, प्रोजेक्ट 15B स्टेल्थ डिस्ट्रॉयर श्रेणीतील चौथे आणि अंतिम जहाज; तर वाघशीर, हे स्कॉर्पिन-श्रेणी प्रकल्पाची सहावी आणि अंतिम पाणबुडी.
- यातीनही लढाऊ युद्धनौका यांचे आरेखन आणि बांधणी संपूर्णपणे मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे करण्यात आली आहे.
- यायुद्धनौका संरक्षण उत्पादनाच्या महत्वपूर्ण क्षेत्रात भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचा पुरावा आहेत.
- याप्रगत युद्धनौका आणि पाणबुड्या यशस्वीरित्या कार्यान्वित केल्याने युद्धनौका आरेखन आणि बांधणी क्षेत्रात भारताने केलेल्या जलद प्रगतीवर प्रकाश पडण्याबरोबर संरक्षण उत्पादनात जागतिक प्रमुख म्हणून भारताचे स्थान आणखी मजबूत झाले आहे.
- निलगिरीहे प्रोजेक्ट 17A चे प्रमुख जहाज, शिवालिक-श्रेणीतील युद्धनौकांच्या तुलनेत एक मोठी प्रगती असून यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महत्त्वपूर्ण स्टेल्थ वैशिष्ट्ये आणि कमी रडार सिग्नेचर (रडारद्वारे लक्ष्य किती सहजपणे शोधले जाऊ शकते याचे एक माप) समाविष्ट आहेत.
- सुरतहे प्रोजेक्ट 15B विनाशक जहाज, कोलकाता-क्लास (प्रोजेक्ट 15A) विनाशकांच्या फॉलो-ऑन क्लासचा चरम बिंदू आहे. या जहाजांच्या आरेखन आणि क्षमतांमध्ये भरीव सुधारणा केलेल्या आहेत. दोन्ही जहाजांची रचना भारतीय नौदलाच्या युद्धनौका आरेखन ब्युरोने केली असून त्या प्रगत सेन्सर्स आणि शस्त्रास्त्र साठ्याने सुसज्ज आहेत.
- हीशस्त्रास्त्रे देखील प्रामुख्याने भारतात किंवा आघाडीच्या जागतिक उत्पादकांसोबत धोरणात्मक सहकार्याने विकसित केली गेली आहेत.
- आधुनिकविमान वाहतूक सुविधांसह सुसज्ज, निलगिरी आणि सूरतमध्ये चेतक, एएलएच, सी किंग आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या MH-60R यासह अनेक हेलिकॉप्टरचा समावेश असून हे हेलिकॉप्टर दिवसा आणि रात्री दोन्हीवेळा चालणाऱ्या मोहीमांमध्ये सहभागी होऊ शकतात.
- याजहाजांमध्ये महिला अधिकारी आणि महिला खलाशांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यासाठी विशिष्ट निवासस्थानांचा देखील समावेश केला आहे, जे आघाडीच्या लढाऊ भूमिकांमध्ये लिंगभाव समावेश करण्याच्या दिशेने नौदलाच्या प्रगतीशील पावलांशी संरेखित आहे.
- वागशीर, हीकलवरी-श्रेणी प्रकल्प 75 अंतर्गत सहावी स्कॉर्पीन-श्रेणीची पाणबुडी असून ती जगातील सर्वात शांत आणि डिझेल-इलेक्ट्रिक दोन्ही इंधनांनवर चालणाऱ्या बहुमुखी पाणबुड्यांपैकी एक आहे.
- पृष्ठभागविरोधीयुद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्त माहिती गोळा करणे, क्षेत्र निरीक्षण आणि विशेष मोहीम यासह विविध मोहिमा हाती घेण्यासाठी या पाणबुडीची रचना करण्यात आली आहे.
- हीपाणबुडी वायर-मार्गदर्शित टॉर्पेडो अर्थात पाणतीर , जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि प्रगत सोनार सिस्टीमसह सज्ज असून पाणबुडीमध्ये मॉड्यूलर बांधकाम देखील आहे. यामुळे यात एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (एआयपी) तंत्रज्ञान यासारख्या भविष्यातील सुधारणांचे एकत्रीकरण करता येईल.
- निलगिरी, सुरतआणि वागशीरचे एकत्रित नौदलात सामील होणे हे संरक्षण स्वावलंबन आणि स्वदेशी जहाजबांधणीमध्ये भारताची अतुलनीय प्रगती दर्शवणारे आहे.
- याजहाजांच्या कठोर चाचण्या घेण्यात आल्या आहेत, ज्यात यंत्रसामग्री, हल, अग्निशमन आणि नुकसान नियंत्रण मूल्यांकन, तसेच समुद्रातील सर्व नेव्हिगेशन आणि दळणवळण यंत्रणा सिद्ध करणे यांचा समावेश आहे.
- यासर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करुन या युद्धनौका पूर्णपणे कार्यान्वित असून तैनातीसाठी तयार आहेत.
- हाऐतिहासिक प्रसंग केवळ नौदलाची सागरी ताकद वाढवणारा नाही तर संरक्षण उत्पादन आणि स्वावलंबनामधील देशाच्या उल्लेखनीय कामगिरीचेही प्रतीक आहे.
- भारतीयनौदल आणि संपूर्ण राष्ट्रासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे, जो एक मजबूत आणि स्वयंपूर्ण संरक्षण परिसंस्था निर्माण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला आणखी बळकट करतो.