भारतीय यांत्रिकी दलांनी एकत्रितपणे आयोजित केलेल्या डावपेचात्मक युद्ध सरावांच्या प्रात्यक्षिकात यावर्षी पहिल्यांदाच ‘स्वार्म’ या भारतीय बनावटीच्या ड्रोन चा वापर करण्यात आला.
अधिक माहिती
● स्वदेशी बनावटीचे स्वार्म ड्रोन झुंड युद्ध तंत्रासाठी, शत्रूवर पाळत ठेवणे तसेच आक्रमण मोहिमांसाठी यांत्रिकी पायदळात दाखल केले आहे.
● त्याचे नोडल सेंटर म्हणून नगर मधील यांत्रिकी पायदळ केंद्राला मान्यता देण्यात आली आहे.
● याच पार्श्वभूमीवर ‘स्वार्म’ ड्रोनचा युद्ध सराव प्रात्यक्षिकात प्रथमच वापर करण्यात आला.
● आर्मर्ड कॉर्प सेंटर अँड स्कूल, मेकॅनैझ्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर यांनी एकत्रितपणे युद्धसरावांची प्रात्यक्षिके नगर शहरा जवळील मनमाड रस्त्यावरील के के रेंज या क्षेत्रात आयोजित करण्यात आली होती.