ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. किराण्या घराण्याच्या गायिका होत्या. दोनच वर्षांपूर्वी कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
अल्पपरीचय
● रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आबासाहेब अत्रे आणि इंदिराबाई अत्रे यांच्या घरामध्ये 13 सप्टेंबर 1932 रोजी प्रभा अत्रे यांचा जन्म झाला.
● इंदिराबाई गाणे शिकत असताना त्यापासून प्रेरित होऊन प्रभाताई वयाच्या 8 व्या वर्षी शास्त्रीय गायनाकडे वळल्या.
● किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित सुरेशबाबू माने आणि नंतर त्यांच्या भगिनी हिराबाई बडोदेकर यांच्याकडून त्यांना घराणेदार गायकीचे शिक्षण मिळाले .
● संगीत शिक्षणाबरोबरच त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान आणि आयएलएस विधी महाविद्यालयातून कायदा विषयात पदवी संपादन केली.
● संगीतातील सरगम गान प्रकारावर संशोधन आणि प्रबंध सादर करून त्यांनी डॉक्टर ऑफ म्युझिक (पीएचडी) संपादन केली.
● लंडन येथील ट्रिनिटी म्युझिक कॉलेजमध्ये पाश्चात्य संगीताचे शिक्षण घेतलेल्या प्रभाताईंनी कथक नृत्य शैलीचे औपचारिक शिक्षण घेतले होते.
● स्वरयोगिनी, संगीत विचारवंत , लेखिका अशी बहुआयामी ओळख असलेल्या डॉ. प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या बुजुर्ग गायिका होत्या.
● त्या पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या होत्या.
सन्मान
● केंद्र सरकारने त्यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल 1990 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
● 2022 मध्ये पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
● अत्रे यांना संगीत नाटक अकादमी तसेच पुण्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
● अत्रे यांची संगीतावरील अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
● प्रभा अत्रे या शास्त्रीय गायन विश्वातील अव्वल कलाकारांपैकी एक होत्या.
● भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यात प्रभा अत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
● प्रभा अत्रे यांचे संगीताच्या विविध शैलींवर प्रभुत्व होते.
● ख्याल, ठुमरी, दादरा, गझल यासारख्या विविध गायन प्रकारांत त्यांचे नैपुण्य होते.