- हिंदुस्तान एअरनॉटिक्स लिमिटेडने पहिले एलसीए तेजस हे दोन आसनी विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केले.
- या विमानाचा प्रशिक्षणासाठी वापर केला जाऊ शकतो तसेच आवश्यकता भासल्यास प्रत्यक्ष आघाडीवर देखील त्यांना तैनात केले जाऊ शकते.
- कंपनीच्या बेंगळुरू येथील एलसीए म्हणजेच ‘लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ तेजस हे विमान वजनाने हलके आहे .
- बहूउपयुक्त असलेले हे विमान 4.5 श्रेणीतील असून कोणत्याही हवामानात ते प्रभावी ठरू शकते.
- अद्ययाव संकल्पना आणि तंत्रज्ञानाचे मिश्रण म्हणजे हे विमान आहे.
- या विमानामुळे भारत उच्च क्षमता असलेल्या देशांच्या यादीत सामील झाला असून भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारतीय उपक्रमाला बळ मिळाले आहे.
- ‘ एलसीए’ तेजस हवाई दलाकडे सुपूर्द करताना संरक्षण राज्यमंत्री अजय भट हवाई दलाचे एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सी.बी. आनंदकृष्णन उपस्थित होते.


