- जगातील प्रभावशाली पासपोर्टच्या ताज्या क्रमवारीनुसार सिंगापूर प्रथम क्रमांकावर आहे.
2022 मध्ये जपान हे पहिल्या क्रमांकावर होते. - भारताच्या पासपोर्टच्या क्रमात पाच स्थानांनी सुधारणा झाली असून या यादीत भारत 80 व्या स्थानावर आहे .
2022 या वर्षी भारत 85 व्या क्रमांकावर होता. - जगातील सर्व देशांच्या पासपोर्ट मध्ये जपानचा पासपोर्ट सर्वात प्रभावशाली होता पण यावर्षी सिंगापूरने जपानला मागे टाकून पहिले स्थान पटकाविले आहे.
- सिंगापूरच्या पासपोर्ट धारकांना जगातील 192 देशांत व्हिसा मुक्त प्रवेश दिला जातो.
- ‘हेन्ले पासपोर्ट इंडेक्स’ च्या वतीने ही क्रमवारी जाहीर करण्यात आली.
- एकूण 103 देशांच्या यादीनुसार सिंगापूर नंतर जर्मनी, इटली आणि स्पेन चा पासपोर्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे .
- या देशांचा पासपोर्ट असेल तर 190 देशांत प्रवेश करण्यास व्हिसाची गरज भासत नाही.
- तिसरे स्थान जपानसह ऑस्ट्रेलिया, फिनलँड, फ्रान्स, दक्षिण कोरिया आणि स्वीडन हे देश संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत.
- या अहवालानुसार अफगाणिस्तानचा पासपोर्ट सर्वात कमजोर असून अफगाणिस्तान हे सर्वात शेवटी म्हणजेच 103 व्या क्रमांकावर आहे.
हेन्ले निर्देशांकातील पहिले दहा क्रंमांकाचे देश:
1) सिंगापूर
2)जर्मनी, इटली, स्पेन ,
3)जपान, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, फ्रान्स, लक्झेंबर्ग, दक्षिण कोरिया ,स्वीडन
4) ब्रिटन, डेन्मार्क, आयर्लंड ,नेदरलँड
5) बेल्जियम, चेक प्रजासत्ताक, मालटा न्यूझीलँड, नॉर्वे, पोर्तुगाल, स्विझर्लंड
6) ऑस्ट्रेलिया, हंगेरी, पोलंड
7) कॅनडा, ग्रीस
8) अमेरिका, लिथूआनिया
9) लॅटिव्हियआ, स्लोवाकिया,स्लोव्होनिया 10)इस्टोनिया, आइसलँड
80)भारत ,टोंगो, सेनेगल
हेन्ले पासपोर्ट इंडेक्स ( HPI ):
हे त्या देशाच्या सामान्य पासपोर्ट धारकांनी तेथील नागरिकांसाठी उपभोगलेल्या प्रवास स्वातंत्र्यानुसार देशांचे जागतिक रँकिंग आहे.
2006 मध्ये Henley & Partners Visa Restrictions Index (HVRI) म्हणून सुरू झाले आणि जानेवारी 2018 मध्ये बदलून Henley passport index नाव देण्यात आले.
मुख्यालय : लंडन
अध्यक्ष: डॉ. ख्रिस्टीयन एच. कॅलिन


