● आंध्र प्रदेशातील वृक्षमित्र म्हणून ओळखले जाणारे दारीपल्ली रामय्या यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले.
● खम्मम जिल्ह्यातील रेड्डीपल्ली गावातील राहत्या घरी निधन झाले.
● व्यवसायाने कुंभार असणाऱ्या रामय्या यांनी औपचारिक शिक्षण घेतले नव्हते.
● बिकट आर्थिक परिस्थितीची परवा न करता गेल्या पाच दशकांपासून वनीकरणासाठी त्यांनी आपले जीवन वाहून घेतले होते .
● घराबाहेर बाहेर पडताना ते स्वतःच्या मानेभोवती एक फलक लावूनच निघत .त्यावर झाडे वाचवा झाडे तुम्हाला वाचवतील असा संदेश लिहिलेला असतो.
● त्यांना 2017 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते