‘इस्रो‘ कडून जीएसएलव्ही–एफ15 चे यशस्वी प्रक्षेपण
- आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील ‘इस्रो’च्या ‘एनव्हीएस-02’ या दळणवळण उपग्रहाचे 29 जानेवारी रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
- या प्रक्षेपणाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (‘इस्रो’) आपली शंभरावी मोहीम पूर्ण केली आहे.
- व्ही .नारायणन यांनी 16 जानेवारीला ‘इस्रो’ची सूत्रे हाती घेतल्यानंतरही ही पहिलीच मोहीम आहे.
- 9 मीटर उंचीचे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (जीएसएलव्ही-एफ 15) प्रक्षेपक 29 जानेवारी रोजी पहाटे 6.23 मिनिटांनी या नियोजित वेळेत अवकाशात झेपावले.
- या टप्प्याचे क्रायोजनिक इंजिन स्वदेशी बनावटीचे आहे.
- ‘एनव्हीएस-02’ हा भारतीय प्रादेशिक दळणवळण उपग्रह मालिकेतील (एनएव्हीआयसी) दुसरा उपग्रह आहे.
- भारतीय भूभागापलीकडे दीड हजार किलोमीटरपर्यंत हा उपग्रह सेवा पुरवणार असून त्यामुळे भारतीय उपखंडातील नागरिकांना अचूक स्थान, वेग, वेळ मिळणार आहे.
- ‘जीएसएलव्ही-एफ-12’ मधून 29 मे 2023 रोजी ‘एनव्हीएस-01’ हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला होता.
- ‘एनएव्हीआयसी’ मध्ये दुसऱ्या पिढीच्या पाच उपग्रहांचा समावेश आहे.
- ‘एनव्हीएस-01’ पासून ‘एनव्हीएस-05’ अशी या उपग्रहांची नावे आहेत.
- या उपग्रहांमुळे अत्याधुनिक यंत्रणा तयार होणार आहे.
- ‘नाविक’ या वापरल्या स्थाननिश्चितीसाठी जाणाऱ्या उपग्रहांच्या समूहाला अद्ययावत करण्यासाठी एनव्हीएस उपग्रहांचे 2023पासून प्रक्षेपण करण्यात येत आहे.
उपग्रहाची वैशिष्ट्ये
- ‘एनव्हीएस-02’ उपग्रहाची रचना आणि निर्मिती यू. आर. उपग्रह केंद्रामध्ये झाली आहे.
- 2,250 किलो उपग्रहाचे वजन आहे.
- भूभागावर, हवाई आणि सागरी, कृषी क्षेत्रात अचूक वेळ, वेग सांगण्यासाठी याचा उपयोग होईल.
- मोबाइलमध्ये लोकेशन अचूक दाखविण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
खनिज अभियानाला केंद्राची मंजुरी
- केंद्र सरकारने १६ हजार ३०० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिज अभियानाला (नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन) मंजुरी दिली.
- स्वावलंबन आणि हरित ऊर्जा संक्रमणाच्या दिशेने देशाचा प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी हे धोरण अवलंबले जात आहे.
- देशांतर्गत आणि विदेशात अत्यावश्यक खनिजांच्या उत्खननास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम या
- मोहिमेत 18 हजार कोटी रुपयांचे योगदान देतील.
- तांबे, लिथियम, निकेल, कोबाल्ट आणि अन्य दुर्मीळ खनिजांचा वापर, स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाच्या वाढीत महत्त्वाचा आहे.
- जगभरात स्वच्छ ऊर्जेच्या प्रयत्नांनी वेग घेतल्याने या खनिजांची मागणी वाढत आहे.
स्टीव्ह स्मिथच्या कसोटीत 10 हजार धावा पूर्ण
- ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
- श्रीलंकेविरुद्धच्या गॅले येथील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 1 धाव करत त्याने 10 हजार धावांचा आकडा गाठला.
- कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा स्टीव्ह स्मिथ हा जगातील 15 वा फलंदाज ठरला आहे.
- अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी माजी कर्णधार रिकी पाँटिंग (13378 धावा), ॲलन बॉर्डर (11174 धावा) आणि स्टीव्ह वॉ (10927 धावा) यांनी ही कामगिरी केली आहे.
- कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरच्या नावे (15,921)