उत्तर प्रदेशात सर्वाधिक डॉल्फिनची नोंद
- देशाच्या जीवनवाहिन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधूच्या उपनद्यांमध्ये डॉल्फिन माशांचे अस्तित्व आढळून आले आहे.
- यामध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2397 डॉल्फिन आढळले आहेत. त्यापाठोपाठ बिहारमध्ये 2220, पश्चिम बंगाल 815आणि आसाममध्ये 635 डॉल्फिन आढळले आहेत.
- या माशांच्या संख्येबाबतचा पहिला अंदाज नुकताच प्रसिद्ध करण्यात आला .
- केंद्र सरकारकडून हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
- गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये आढळून येणारे डॉल्फिन हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
- गंगा- ब्रह्मपुत्रा या नद्या आणि त्यांच्या उपनद्यांमध्ये डॉल्फिनचे अस्तित्व आढळून आले आहे.
- भारत, बांगलादेश, नेपाळ आणि भुतान या देशांमध्ये डॉल्फिन माशांची संख्या मोठी असल्याचे दिसून येते.
प्रोजेक्ट डॉल्फिन
- उत्तर प्रदेश, बिहार ,झारखंड ,राजस्थान ,मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि पंजाब या 8 राज्यामध्ये प्रोजेक्ट डॉल्फिन राबविण्यात आला.
- भारतात 6,327 डॉल्फिन ची नोंद
- 15 ऑगस्ट 2020 प्रोजेक्ट डॉल्फिन ची पंतप्रधानांनकडून घोषणा
- सर्वेक्षणाचा कालावधी – 2021-23
- सर्वेक्षण – 8 ,000 किमी
- 58 नद्यांची पाहणी करण्यात आली.
- 30 नद्यांचे रस्त्यावरून सर्वेक्षण करण्यात आले.
- प्रोजेक्ट डॉल्फिन ही नदीकाठच्या आणि समुद्रातील डॉल्फिनच्या संरक्षणासाठी भारतात सुरू केलेली वन्यजीव संवर्धन चळवळ आहे .
- हा प्रकल्प 2021 मध्ये भारत सरकारच्या पर्यावरण , वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सुरू केला होता
- भारतातील डॉल्फिन वाचवण्यासाठी प्रकल्प राबविण्याची मागणी वन्यजीव कार्यकर्त्यांनी केल्यानंतर, 2021मध्ये नदी आणि समुद्रातील डॉल्फिन प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी भारत सरकारचा एक उपक्रम म्हणून प्रोजेक्ट डॉल्फिन सुरू करण्यात आला.
- 15 ऑगस्ट 2020 रोजी तत्कालीन भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात याची घोषणा केली होती .
- हा प्रकल्प पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या स्वायत्त संस्थे असलेल्या वन्यजीव संस्थेच्या अखत्यारीत आहे .