‘ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ ने नरेंद्र मोदी सन्मानित
- कोविड काळात भारताने दिलेली मदत आणि पाठिंबा याची जाणीव ठेवून बार्बाडोस सरकारने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा जाहीर गौरव केला.
- पंतप्रधान मोदी यांच्यावतीने ‘ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ हा पुरस्कार भारताचे परराष्ट्र आणि कापड उद्योग राज्यमंत्री पाबित्रा मार्गेरिटा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
- बार्बाडोसचे पंतप्रधान अमोर मोटले यांनी 20 नोव्हेंबर 2024 रोजी गुयानातील जॉर्जटाउनमध्ये भारत-कॅरिकॉम नेत्यांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली.
- हा पुरस्कार मार्च 2025 मध्ये पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात आला
- बार्बाडोसचा ऑर्डर ऑफ फ्रीडम हा बार्बाडोसच्या संसदेने 2019 च्या ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस कायद्याद्वारे स्थापित केलेला राष्ट्रीय सन्मान आहे
- बार्बाडोसचा हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले