ऑस्ट्रेलियन ओपन 2025
पुरुष एकेरी
- ऑस्ट्रेलियन ओपन 2025 पुरुष गटाचं जेतेपद यानिक सिनरने आपल्या नावावर केलं आहे. त्याने अंतिम फेरीत जर्मनीच्या अॅलेक्झांडर झ्वेरेवचा 6-5, 7-6(7-4), 6-4 असा सरळ पराभूत करत किताब पटकावला.
- दोन्ही खेळाडूंमध्ये हा सामना जवळपास 2 तास आणि 42 मिनिटं चालला.
- यानिक सिनरने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपदावर नाव कोरलं.
- यानिकने मागच्या 13 महिन्यात तिसऱ्यांदा ग्रँड स्लॅम किताब जिंकला आहे.
- यात युएस ओपन 2024 आणि मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेचा समावेश आहे.
- ऑस्ट्रेलियन ओपनच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवणारा यानिक सिनर हा 11 वा खेळाडू ठरला आहे. तर सलग दोनदा हे विजेतेपद पटकावणारा तो जिम कुरियर (1992 आणि 1993) नंतरचा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे.
महिला एकेरी
- अमेरिकेच्या 29 वर्षीय मॅडिसन कीज हिने सलग दोन वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या बेलरूसच्या एरिना सबालेंका हिचा चुरशीचा सामन्यात पराभव करून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
- हे तिचे पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.
- मॅडिसन हिची ही दुसरी ग्रँडस्लॅम अंतिम फेरी होती. यापैकी पहिली लढत ती सात वर्षांपूर्वी खेळली होती. (2017 अमेरिकन ओपन)
- या सामन्यात तिने 6-3, 2-6, 7-5 असा विजय मिळवला आणि .
- मॅडिसन ही पहिल्यांदा ग्रँड स्लॅम जिंकणारी चौथ्या क्रमांकाची वयस्क महिला ठरली.
ऑस्ट्रेलियन ओपन:
- सुरवात : 1905
- 2024 ची 113 वी स्पर्धा
- वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा
- ही स्पर्धा हार्ड कोर्टवर खेळवली जाते
जीवन रक्षा पदक
- देशातील 49 जणांना जीवन रक्षणाची कामगिरी बजावल्याबद्दल ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले.
- यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर गृहमंत्रालयाने ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार 2024’ची घोषणा केली.
- यात महाराष्ट्रातील शशिकांत रामकृष्ण गजबे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले.
- तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार दादाराव गोविंदराव पवार, ज्ञानेश्वर मुकुंदराव भेदोडकर यांना जाहीर करण्यात आले.
- ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ विजेत्यांमध्ये 17 जणांचा समावेश असून त्यातील पाच जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला. तर, उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार विजेत्यांमध्ये नऊ जणांचा समावेश आहे.
- याखेरीज 23 जणांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
- पदक, गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि रोख रकम असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
- जीवन रक्षा पदक हा नागरी जीवनरक्षक पुरस्कार आहे.
- हा पुरस्कार 30 सप्टेंबर 1961 रोजी सुरू झाला होता.
- या पुरस्काराला सुरुवातीला जीवन रक्षा पदक, वर्ग III असे म्हटले जायचे.
जीवन रक्षा पदक या पुरस्काराबद्दलची माहिती:
- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जीवन रक्षा पदकांची यादी जाहीर केली जाते.
- या पुरस्कारात सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, उत्तम जीवन रक्षा पदक आणि जीवन रक्षा पदक असे प्रकार असतात.
- या पुरस्कारांमध्ये काही पुरस्कार मरणोत्तरही प्रदान केले जातात.
- एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्याच्या मानवतावादी कृतीसाठी जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार प्रदान केले जातात.
- हा पुरस्कार सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, उत्तम जीवन रक्षा पदक आणि जीवन रक्षा पदक या तीन श्रेणींमध्ये दिला जातो.
- सर्व क्षेत्रातील व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत.