- केरळ राज्याचे ‘केरळम’ असे नामांतर करण्यासाठीचा प्रस्ताव केरळच्या विधानसभेत 24 जून रोजी एकमताने मंजूर करण्यात आला.
- गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये याबाबत एक प्रस्ताव मंजूर झाला होता. मात्र, हे नामांतर होण्यासाठी काही तांत्रिक बदलांची आवश्यकता असल्याचे केंद्र सरकारने सुचवले होते.
- त्यानुसार नव्याने हा प्रस्ताव पारित करण्यात आला.
- मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी हा प्रस्ताव सादर केला.
- ‘देशातील सर्व भाषांमध्ये हा नामबदल व्हावा व राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात या बदलाचा समावेश करावा,’ अशी मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे.
- सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक दि फ्रंटसह विरोधी बाकांवरील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटनेही या प्रस्तावास पाठिंबा दिला.