● छत्तीसगड सरकारच्या मंत्रिमंडळाने ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी होमस्टे धोरणास नुकतीच मंजुरी दिली.
● बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय होते.
● यामध्ये नक्षलवाद्यांचे वर्चस्व असलेल्या बस्तर विभागाचाही समावेश आहे.
● एकीकडे बस्तरमध्ये सध्या नक्षलविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली असताना दुसरीकडे विकासकामांसह पर्यटनालाही चालना दिली जात आहे.
● राज्य सरकारच्या या निर्णयामुळे स्थानिकांना उत्पन्नाचे साधन मिळण्यास मदत होणार आहे.
● ‘छत्तीसगड होमस्टे धोरण 2025-30’ मुळे पर्यटकांना ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्याबरोबरच स्थानिक ग्रामस्थांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण केल्या जातील.
● या धोरणातून पर्यटन वाढवून स्थानिक अर्थव्यसवस्थेला चालना देण्याचा सरकारचा उद्देश आहे.
● विशेषतः आदिवासीबहुल बस्तर आणि सुरगुजा विभागांत ग्रामीण पर्यटनाला चालना दिली जाईल. त्यातून पर्यटकांना ग्रामीण जीवनाचा अनुभव घेता येईल.
● होमस्टे सुविधेमुळे पर्यटकांना ग्रामीण जीवनाचा अनुभव घेता येईल आणि आदिवासी भागांची वैशिष्ट्ये, स्थानिक संस्कृती, कला आणि हस्तकला यांचे दर्शनही घडेल.
● या उपक्रमामुळे पर्यटकांना स्थानिक जीवनशैलीचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
● या नवीन धोरणामुळे स्थानिकांना उद्योगाच्या व त्यातून उत्पन्न वाढविण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
‘युवारत्न सन्मान योजने’ची घोषणा
● युवक कल्याणाच्या विविध क्षेत्रांत असामान्य कामगिरी करणारे युवक व संघटनांचा गौरव करण्यासाठी ‘युवारत्न सन्मान योजनेची घोषणाही करण्यात आली.
● दरवर्षी युवक व संस्थेची निवड केली जाईल.
● युवकाला पदक, प्रमाणपत्र आणि अडीच लाख रुपये तर संस्थेला पाच लाखांच्या पुरस्काराने गौरविण्यात येईल.