● जागतिक महासागर दिन दरवर्षी 8 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस महासागरांचे महत्त्व आणि त्यांच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी असतो.
जागतिक महासागर दिनाचा इतिहास:
● 1992 मध्ये, कॅनडियन शिष्टमंडळाने संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेत महासागरांचा सन्मान करण्यासाठी एक दिवस पाळण्याची कल्पना मांडली.
● 2002 मध्ये, जागतिक समन्वय सुरू करण्यात आला आणि हा दिवस जगभरात साजरा होऊ लागला.
● 2008 मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाला अधिकृतपणे मान्यता दिली.
जागतिक महासागर दिनाचा उद्देश:
● महासागरांचे संरक्षण आणि पुनर्संचयित करण्यासाठी जगाला एकत्र आणणे, महासागरांच्या आरोग्यासाठी जनजागृती करणे, महासागरावरील मानवी कृतींच्या प्रभावाची माहिती देणे.
● जागतिक महासागर दिन २०२५ ची थीम आहे: “आपला महासागर, आपली जबाबदारी, आपली संधी”. ही थीम जागतिक अर्थव्यवस्थेत महासागराची महत्त्वाची भूमिका प्रतिबिंबित करते