● जोआना चाइल्ड या 64 वर्षीय महिलेने विक्रम नोंदवला. पोर्तुगाल महिला संघामधून तिने टी-20आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा पराक्रम केला.
● टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी ती दुसरी वयस्क महिला खेळाडू ठरली हे विशेष.
● जोआना चाइल्ड हिने नॉर्वेविरुद्ध पहिला सामना खेळला.
● पोर्तुगाल व नॉर्वे यांच्यामध्ये तीन सामन्यांची मालिका पार पडली.
● या मालिकेत पोर्तुगालने 2-1 अशी बाजी मारली.
सॅली बार्टन सर्वात वयस्क खेळाडू
● महिला क्रिकेटमध्ये वयस्क खेळाडूचा विक्रम जिब्राल्टरच्या सॅली बार्टन हिच्या नावावर आहे.
● तिने 66 व्या वर्षी टी-20 क्रिकेटमध्ये पहिला सामना खेळला, हे विशेष.
● अँड्यू ब्राऊनली व मॅली मूर यांनी 62 व्या वर्षी पहिला टी-20 सामना खेळण्याचा मान संपादन केला होता.
● जोआना चाइल्ड ही दुसऱ्या क्रमांकाची वयस्क खेळाडू ठरली.