दिल्लीत भाजप विजयी
- दिल्ली विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या भारतीय जनता पक्षाने दिल्लीतील आपला सुमारे तीन दशकांचा सत्तादुष्काळ संपवला.
- विधानसभेच्या 70 पैकी 48 जागा जिंकून भाजपने आम आदमी पक्षाचा (आप) पराभव केला.
- गेली 12 वर्षे सत्तेत राहिलेल्या ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षाच्या बड्या नेत्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.
- गेल्या वेळी 62 जागा जिंकलेल्या ‘आप’ला या वेळी 22 जागांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
- सन 1998 ते 2013 अशी पंधरा वर्षे दिल्लीत सत्तास्थानीं राहिलेल्या काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा खाते उघडण्यासही अपयश आले.
दिल्ली विधानसभा निकाल
एकूण जागा 70
पक्ष जिंकलेल्या जागा
- भाजप 48
- आम आदमी पार्टी 22
- काँग्रेस 00