● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ‘विशिष्ट प्रशासन कौशल्य आणि प्रभावी जागतिक नेतृत्वा’साठी घानाचा ‘ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला.
● घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांच्याकडून सन्मानित करण्यात आले.
● मोदी यांनी हा सन्मान दोन्ही देशांच्या युवकांच्या आकांक्षा आणि उज्ज्वल भविष्य, घाना आणि भारत यांच्यातील ऐतिहासिक संबंध, त्यांच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, विविधतेला समर्पित केला.
● या सन्मानाची जबाबदारी म्हणजे भारत-घाना मैत्री अधिक मजबूत करण्यासाठी काम करणे असे सांगत भारत नेहमीच घानाच्या लोकांसोबत उभा राहील आणि एक विश्वासू मित्र आणि विकास भागीदार म्हणून योगदान देत राहील, असे पंतप्रधान म्हणाले.
एनकुमा यांना श्रद्धांजली
● पंतप्रधान मोदी यांनी क्वामे एनकुमा मेमोरियल पार्क (केएनएमपी) येथे घानाचे पहिले राष्ट्रपती आणि आफ्रिकन स्वातंत्र्य चळवळीचे नेते डॉ. क्वामे एनक्रमाह यांना श्रद्धांजली अर्पण केली.
● घानाच्या उपराष्ट्रपती प्रोफेसर नाना जेन ओपोकू-अग्येमांग उपस्थित होत्या.
● या वेळी स्वातंत्र्य, एकता आणि सामाजिक न्यायासाठी एनकुमाह यांच्या योगदानाचे स्मरणही केले.
● 1957 मध्ये घानाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि पॅन-आफ्रिकन चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी ओळखले जाणारे एनकुमाह हे आफ्रिकन इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते.