Shopping cart

shape
shape
पद्म पुरस्कार 2025
पद्म पुरस्कार 2025

पद्म पुरस्कार 2025

  • कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक जीवन, विज्ञान व अभियांत्रिकी, व्यापार व उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा यांसारख्या क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या 139 व्यक्तिमत्त्वांची पद्म पुरस्कारांसाठी निवड झाली आहे.
  • त्यात 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण, तर 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
  • यावेळी नागरी पुरस्काराने गौरविलेल्या मान्यवरांमध्ये 23 महिला, 10 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे, तर 13 जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • महाराष्ट्रातील एकूण 3 जणांना पद्मभूषण तर 13 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले.

पद्मविभूषण(07)

नाव क्षेत्र राज्य

1)दुवूर नागेश्वर रेड्डी (आरोग्य)  ( तेलंगण)

2)न्या. जगदीशसिंग खेहर (सा.कार्य)  (चंडीगड)

3)कुमुदिनी लाखिया  (कला )   ( गुजरात)

4)लक्ष्मीनारायण सुब्रह्मण्यम  (कला)  (कर्नाटक)

5)एम. टी. वासुदेवन नायर (मरणोत्तर)साहित्यकेरळ

6)ओसामू सुझुकी (मरणोत्तर) उद्योग जपान

7)शारदा सिन्हा (मरणोत्तर) कला बिहार

पद्मभूषण(19)

नाव    क्षेत्र    राज्य

1)ए. सूर्या प्रकाश, साहित्य  , कर्नाटक

2)अनंत नाग  ,कला  ,कर्नाटक

3)विवेक देबरॉय (मरणोत्तर) ,साहित्य ,दिल्ली

4)जतिन गोस्वामी ,कला ,आसाम

5)जोस चाको पेरियापुरम ,वैद्यकीय ,केरळ

6)कैलासनाथ दीक्षित, पुरातत्त्व विभाग ,दिल्ली

7)मनोहर जोशी (मरणोत्तर) ,सार्वजनिक कार्य,महाराष्ट्र

8)नल्ली कुप्पुस्वामी चेट्टी ,उद्योग ,तमिळनाडू

9)नंदामुरी बालकृष्ण, कला, आंध्र प्रदेश

10)पी. आर. श्रीजेश, क्रीडा, केरळ

11)पंकज पटेल ,उद्योग ,गुजरात

12)पंकज उधास (मरणोत्तर) ,कला ,महाराष्ट्र

13)रामबहादूर राय, साहित्य, उत्तर प्रदेश

14)साध्वी ऋतंभरा ,सामाजिक कार्य,उत्तर प्रदेश

15)एस. अजितकुमार ,कला ,तमिळनाडू

16)शेखर कपूर ,कला ,महाराष्ट्र

17)शोभना चंद्रकुमार, कला ,तमिळनाडू

18)सुशील मोदी (मरणोत्तर) ,सार्वजनिक कार्य,बिहार

19)विनोद धाम ,विज्ञान आणि अभियांत्रिकी,अमेरिका

पद्मश्री (113)

नाव  क्षेत्र  राज्य

1)अद्वैत्त चरण गडानायक ,कला ,ओडिशा

2)अच्युत रामचंद्र पालव, कला, महाराष्ट्र

3)अजय व्ही. भट ,विज्ञान ,अमेरिका

4)अनिलकुमार बोरो ,शिक्षण ,आसाम

5)अरिजित सिंह, कला ,पश्चिम बंगाल

6)अरुंधती भट्टाचार्य, व्यापार ,महाराष्ट्र

7)अरुणोदय साहा ,साहित्य ,त्रिपुरा

8)अरविंद शर्मा ,साहित्य, कॅनडा

9)अशोककुमार महापात्रा ,वैद्यकीय, ओडिशा

10)अशोक लक्ष्मण सराफ, कला ,महाराष्ट्र

11)आशुतोष शर्मा ,विज्ञान ,उत्तर प्रदेश

12)अश्विनी भिडे देशपांडे ,कला ,महाराष्ट्र

13)बैजनाथ महाराज ,अध्यात्म ,राजस्थान

14)बॅरी गॉडफ्रे ,कला ,दिल्ली

15)रेखा कांता महंता, कला ,आसाम

16)रेथंलेई लालरवाना ,शिक्षण ,मिझोराम

17)रिकी ग्यान केज ,कला, कर्नाटक

18)सज्जन भाजंका ,उद्योग ,पश्चिम बंगाल

19)सायली होळकर ,व्यापार, मध्य प्रदेश

20)संतराम देसवाल ,साहित्य, हरियाना

21)सत्यपाल सिंह, क्रीडा ,उत्तर प्रदेश

22)सिनी विश्वनाथन ,साहित्य ,तमिळनाडू

23)सेथुरामन पंचानाथम, विज्ञान ,अमेरिका

24)रोईखा शैखा अल- जाबेर अल सबा,वैद्यकीय, कुवैत

25)शिन काफ निजाम ,साहित्य, राजस्थान

26)श्यामबिहारी अग्रवाल ,कला ,उत्तर प्रदेश

27)सोनिया नित्यानंद ,वैद्यकीय ,उत्तर प्रदेश

28)स्टिफन खाप, साहित्य ,अमेरिका

29)सुभाष खेतुलाल शर्मा ,कृषी ,महाराष्ट्र

30)सुरेश हरिलाल सोनी ,समाज कार्य, गुजरात

31)सुरिंदर कुमार वसाल, विज्ञान, दिल्ली

32)स्वामी प्रदिप्तानंद (कार्तिक महाराज) ,अध्यात्म ,प. बंगाल

33)सईद ऐनूल हसन, साहित्य, उत्तर प्रदेश

34)तेजेंद्र नारायण मजूमदार, कला, पश्चिम बंगाल

35)थियाम सुर्यमुखी देवी ,कला ,मणिपूर

36)तुषार शुक्ला ,साहित्य ,गुजरात

37)वडिराज पंचमुखी ,साहित्य ,आंध्र प्रदेश

38)वासुदेव कामत ,कला, महाराष्ट्र

39)वेलु आसन, कला ,तमिळनाडू

40)व्यंकप्पा सुगतेकर ,कला ,कर्नाटक

41)विजय नित्यानंद सुरिश्वर, अध्यात्म ,बिहार

42)विजयालक्ष्मी देशमाने ,आरोग्य ,कर्नाटक

43)विलास डांगरे, आरोग्य, महाराष्ट्र

44)विनायक लोहनी, समाजकार्य, प. बंगाल

45)मारुती चितमपल्ली ,साहित्य ,महाराष्ट्र

46)चैत्रराम पवार ,समाजकार्य ,महाराष्ट्र

47)जसपिंदर नरुला ,कला ,महाराष्ट्र

48)राणेंद्र भानू मजुमदार ,कला ,महाराष्ट्र

49)बेगम बातूल ,कला, राजस्थान

50)भारत गुप्त ,कला ,दिल्ली

51)भेरीसिंह चौहान ,कला ,मध्य प्रदेश

52)भीमसिंह भावेश ,समाजकार्य ,बिहार

53)भीमव्वा शिल्लेक्याथारा ,कला ,कर्नाटक

54)बुधेंद्रकुमार जैन ,आरोग्य, मध्य प्रदेश

55)सी. एस. वैद्यनाथन ,सार्वजनिक कार्य,दिल्ली

56)चंद्रकांत सेठ ,साहित्य ,गुजरात

57)चंद्रकांत सोमपुरा ,कृषी ,गुजरात

58)चेतन चिटणीस ,विज्ञान- अभियांत्रिकी,फ्रान्स

59)डेव्हिड सियमेलिह ,साहित्य ,मेघालय

60)दुर्गाचरण रणबीर ,कला, ओडिशा

61)फारुक अहमद मीर, कला, जम्मू- काश्मीर

62)गणेश्वर शास्त्री द्रवीड ,साहित्य, उत्तर प्रदेश

63)गीता उपाध्याय ,साहित्य, आसाम

64)गोकुळचंद्र दास ,कला, पश्चिम बंगाल

65)गुरुवायूर दोराई ,कला, तमिळनाडू

66)हरचंद्रनसिंग भट्टी ,कला, मध्य प्रदेश

67)हरीमन शर्मा, कृषी ,हिमाचल प्रदेश

68)हरजिंदरसिंग श्रीनगरवाले ,कला ,पंजाब

69)हरविंदरसिंग ,क्रीडा, हरियाना

70)हसन राघू ,कला ,कर्नाटक

71)हेमंतकुमार ,आरोग्य ,बिहार

72)हृदयनारायण दीक्षित ,साहित्य ,उत्तर प्रदेश

73)हग गॅटेझर-कॉलीन गँटेंझर (दाम्पत्य) (मरणोत्तर), साहित्य- पत्रकारिता, उत्तराखंड

74)इनिवालपल्ली मणी विजयन ,क्रीडा ,केरळ

75)जगदीश जोशीला ,साहित्य ,मध्य प्रदेश

76)जोनास मसेत्ती ,अध्यात्म, ब्राझील

77)जॉयनाचरन बथेरी ,कला ,आसाम

78)जुमडे योमगाम गॅमलिन ,समाजकार्य,अरुणाचल प्रदेश

79)के. दामोदरन ,अन्य (पाककला), तमिळनाडू

80)के. एल. कृष्णा ,साहित्य ,आंध्र प्रदेश

81)के. ओमानकुट्टी अम्मा, कला ,केरळ

82)किशोर कुणाल (मरणोत्तर) नागरी सेवा ,बिहार,

83)एल. हँगथिंग ,कृषी ,नागालँड

84)लक्ष्मीपती रामसुब्बयार, साहित्य- पत्रकारिता ,तमिळनाडू

85)ललितकुमार मंगोत्रा साहित्य, जम्मू- काश्मीर,

86)लामा लोबझांग (मरणोत्तर),अध्यात्म ,लडाख

87)लिबिया लोबो सरदेसाई ,समाजकार्य,गोवा

88)एम. डी. श्रीनिवास ,विज्ञान- अभियांत्रिकी,तमिळनाडू

89)मदुगुला नागफणी शर्मा ,कला ,आंध्र प्रदेश

90)महावीर नायक ,कला ,झारखंड

91)ममता शंकर ,कला ,पश्चिम बंगाल

92)मंदा कृष्ण मडिगा ,सार्वजनिक कार्य ,तेलंगण

93)मृरियाला अप्पाराव (मरणोत्तर) ,कला,आंध्र प्रदेश

94)नागेंद्रनाथ रॉय ,साहित्य ,पश्चिम बंगाल

95)नारायण (भुलाई भाई) (मरणोत्तर) ,सार्वजनिक कार्य, उत्तर प्रदेश

96)नरेन गुरुंग ,कला ,सिक्कीम

97) नीरजा भाटला, आरोग्य ,दिल्ली

98) निर्मला देवी ,कला, बिहार

99)नितीन नोहरिया, साहित्य ,अमेरिका

100)ओंकारसिंह पाहवा ,व्यापार-उद्योग,पंजाब

101)पी. दत्चनमूर्ती ,कला ,पुदुच्चेरी

102)पंडीराम मांडवी ,कला ,छत्तीसगड

103)लावजीभाई परमार ,कला, गुजरात

104)पवन गोएंका ,व्यापार-उद्योग,पश्चिम बंगाल

105)प्रशांत प्रकाश ,व्यापार-उद्योग ,कर्नाटक

106)प्रतिभा सत्पती, साहित्य ,ओडिशा

107)पुरीसाई संबंदन ,कला ,तमिळनाडू

108)आर. अश्विन ,क्रीडा, तमिळनाडू

109)आर. जी. चंद्रमोगन ,व्यापार-उद्योग,तमिळनाडू

110) राधा बहीन भट्ट, समाजकार्य ,उत्तराखंड

111) राधाकृष्ण देवसेनपती, कला ,तमिळनाडू

112) रामदर्श मिश्रा ,साहित्य, दिल्ली

113) रतनकुमार परिमानू ,कला ,गुजरात

  • पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून देण्यात येणारे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत.
  • पद्म पुरस्काराचे स्वरूप पदक आणि प्रशस्तीपत्र असे असते. पद्म पुरस्कारांचे तीन प्रकार आहेत – पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री
  • 1954 मध्ये पुरस्काराला सुरवात झाली

अर्शदीप वर्षातील सर्वोत्तम टी-20 खेळाडू

  • भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील 2024 वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.
  • भारताने 2024 या वर्षी ट्वेन्टी-20विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते.
  • भारताच्या यशात अर्शदीपचाने वाटा मोठा होता.
  • या स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो (8 सामन्यांत 17 बळी) दुसऱ्या स्थानी होता.
  • वर्षभरात अर्शदीपने 18 आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी- 20 सामने खेळताना 36गडी बाद केले.
  • पॉवर-प्ले आणि अखेरच्या षटकांत अर्शदीपची गोलंदाजी वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

भारत, इंडोनेशियाचा सागरी सुरक्षा करार

  • भारत आणि इंडोनेशियाने संरक्षण क्षेत्रातील उत्पादन व पुरवठा साखळीसाठी संयुक्तपणे काम करण्याचा निर्णय घेतला.
  • प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी भारत दौऱ्यावर आलेले इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
  • त्यामध्ये द्विपक्षीय व्यापार वाढवणे, सागरी सुरक्षेला चालना देणे यावर सहमती झाली.
  • मोदी आणि सुबियांतो यांच्या चर्चेनंतर दोन्ही देशांदरम्यान आरोग्य, सागरी सुरक्षा, संस्कृती व डिजिटल अवकाश या क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी किमान पाच करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
  • दोन्ही देश प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि नियमाधारित सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
  • दक्षिण चिनी समुद्रामध्ये चीन आणि इंडोनेशियादरम्यान लष्करी तणाव वाढत असताना भारत, इंडोनेशियाने सागरी सहकार्याचा निर्णय घेतला आहे.

इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे

  • 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो प्रमुख पाहुणे असतील. कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात इंडोनेशियाचे मार्चिग पथक आणि बँड पथकदेखील सहभागी होणार.
  • भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे सुबियांतो हे इंडोनेशियाचे चौथे अध्यक्ष आहेत.
  • पहिल्या प्रजासत्ताक दिनाला इंडोनेशियाचे पहिले अध्यक्ष सुकर्णो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख वैशिष्ट्ये:

  • भारतीय संविधानाची 75 वर्षे संचलनाचा केंद्रबिंदू
  • ‘सुवर्ण भारत – वारसा आणि विकास’ या कल्पनेवर आधारित चित्ररथांचे देखावे
  • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे 16 तर केंद्रीय मंत्रालये, विभाग आणि संघटनांकडून 15 चित्ररथ
  • चित्ररथांमध्ये तिन्ही सैन्यदलांशी संबंधित देखावा
  • स्वदेशी अर्जुन युद्ध रणगाडा, तेजस लढाऊ विमान आणि प्रगत हलक्या हेलिकॉप्टरचा समावेश
  • ‘मजबूत आणि सुरक्षित भारत’ या संकल्पनेवर आधारित लष्कराचे देखावे असतील.
  • सी-130 जे सुपर हर्म्युलिस, सी- 295, सी-17 ग्लोबमास्टर, पी-8 आय, मिग-29 आणि एसयू-30यासह इतर विमानांचाही समावेश
  • उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, बिहार, झारखंड, गुजरात, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि दिल्लीचे चित्ररथ.

न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे निधन

  • ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.
  • वर्धा येथे झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
  • मराठीला लाभलेल्या सामाजिक आणि राजकीय विचारवंतांच्या परंपरेचे पाईक असलेल्या चपळगावकर यांनी गेली सहा दशके विविध माध्यमांतून समाजाला शहाणे करण्याचे व्रत निष्टेने सांभाळले.

अल्प परीचय:

  • न्या. चपळगावकर यांचा जन्म 14 जुलै 1938 मध्ये बीड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बीड येथे तर महाविद्यालयीन शिक्षण अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर येथे झाले.
  • नानासाहेब या नावाने परिवारात परिचित असणारे चपळगावकर मुळचे बीड जिल्ह्यातील. त्यांचे वडील पुरुषोत्तमराव चपळगावकर हे हैदराबाद मुक्तिसंग्रामातील नेते व स्वामी रामानंद तीर्थ यांचे निष्ठावंत अनुयायी होते.
  • शिक्षणानंतर त्यांनी काही काळ मराठीचे अध्यापन आणि वकिली केली. तरुण वयात त्यांनी वर्तमानपत्र व मासिकांमध्ये लेखन केले. वकिली करत असतानाच समाजवादी विचारांचा प्रभाव असलेले नानासाहेब राजकारणात ओढले गेले.
  • ते बीड नगरपालिकेचे सदस्य म्हणूनही निवडून आले होते.
  • पुढे 1979 साली त्यांनी मुंबई येथे उच्च न्यायालयात वकिली सुरू केली.
  • गोपाळ गणेश आगरकर आणि न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या वैचारिक वारसा नानासाहेब चपळगावकर यांनी पुढे चालविला.
  • ते1989 ते 1999 मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.
  • सर्वसामान्यांच्या प्रश्नांची दखल खंडपीठाच्या स्थापनेनंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्य केले.
  • वडिलांचे राजकारण आणि समाजकारणाच्या संस्कारांमधून सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे त्यांनी आस्थेने पाहण्यास सुरुवात झाली व ते वैचारिक लेखनाकडे वळले.
  • 2005 मध्ये माजलगाव येथे झालेले 26 वे मराठवाडा साहित्य संमेलन, राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, नववे जलसाहित्य संमेलन यांचे अध्यक्षपदही चपळगावकर यांनी भूषविले होते.
  • हैदराबाद मुक्तिलढ्यावर संशोधनात्मक लेखन त्यांनी केले. धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळाचे ते पाच वर्षे अध्यक्ष होते.
  • मराठवाडा साहित्य परिषदेने चपळगावकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.
  • साहित्य लेखनासाठी चपळगावकर यांना ‘भैरूरतन दमाणी पुरस्कार’, महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, राज्य सरकारचे वाङ्मय पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
  • नाशिकच्या ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चे ते अध्यक्ष राहिले.
  • चपळगावकर यांनी प्रामुख्याने वैचारिक व ललित लेखन केले.
  • ‘सावलीचा शोध’, ‘मनातली माणसं’, ‘महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना’, ‘टिळक गांधी : नेतृत्वाची सांधेजोड’, ‘आठवणीतले दिवस’, ‘त्यांना समजून घेताना’, ‘अनंत भालेराव – काळ आणि कर्तृत्व’, ‘तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ’, ‘कर्मयोगी संन्यासी’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *