सध्या सुरु असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान अनेक महिलांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळालेल्या एल पी जी अर्थात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर मुळे त्यांच्या जीवनात आलेल्या परिवर्तनाबद्दल माहिती दिली. एल पी जी गॅस सिलेंडर सारख्या एका छोट्याशा गोष्टीमुळे देशभरातील महिलांना अनेकविध लाभ झाले आहेत.
• काहींना पारंपरिक चुलीवर स्वयंपाक केल्यामुळे निर्माण होत असलेल्या शरीराला हानिकारक अशा धुरापासून मुक्ती मिळाल्याचा आनंद आहे तर काहींना सरपण गोळा करण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत यांची बचत झाल्याने समाधान वाटत आहे.
• या यात्रेच्या एक महिन्याच्या कालावधीत सुमारे 3.77 लाख महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केल्याने वर्ष 2016 मध्ये या योजनेच्या आरंभानंतर आतापर्यंत लाभ मिळालेल्या कोट्यवधी महिलांमध्ये त्यांची भर पडली आहे.
• ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना एलपीजीसारखे स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने मे 2016 मध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजना (पीएमयूवाय) सुरू केली.