- अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे दरवर्षी दिले जाणारे मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक यावर्षी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांना जाहीर झाले.
- गौरव पदक रोख, 25 हजार रुपये, स्मृतीचिन्ह शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- नाट्य विद्य मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे यांनी प्रशांत दामले यांच्या नावाची घोषणा केली.
- नाट्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत दामले यांनी मराठी चित्रपट ,दूरदर्शन, नाट्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना यावर्षीचा पुरस्कार दिले असल्याचे सांगण्यात आले.
- मागील 40 वर्षात प्रशांत दामले यांनी 12,500 पेक्षा अधिक नाट्य प्रयोग केले आहेत आज अखेर 37 मराठी चित्रपट 24 दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
- यावर्षीचा हा 56 वा पुरस्कार असून 5 नोव्हेंबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
- दरवर्षी रंगभूमी नाट्य संमेलन अध्यक्षांच्या हस्ते पुरस्कार वितरित केला जातो.