● लिव्हरपूल आणि पोर्तुगालचा नामांकित फुटबॉलपटू दिओगो जोटा, तसेच त्याचा बंधू आंद्रे सिल्वा यांचा कार अपघातात मृत्यू झाला. दिओगो 28, तर आंद्रे 25 वर्षांचा होता.
● स्पेनच्या वायव्येकडील झमोरा शहरातील सेर्नाडिला येथे त्यांच्या लॅबोर्गिनी गाडीचा 2 जुलैच्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भीषण अपघात झाला.
● गाडी भरधाव असताना मागच्या बाजूचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे गाडी रस्त्याबाहेर जाऊन उलटली आणि तिने पेट घेतला. यातून दिओगो आणि आंद्रे बचावू शकले नाहीत.
● दिओगोने दोन महिन्यांपूर्वीच लिव्हरपूलसह इंग्लिश प्रीमियर लीगचे जेतेपद पटकावले होते.
● लिव्हरपूलने 2020 मध्ये दिओगोला प्रीमियर लीगमधील वोल्व्हज संघाकडून आपल्या संघात समाविष्ट करून घेतले होते.
● त्याने या क्लबकडून एकूण 182 सामने खेळताना 65 गोल नोंदवले. त्याचा समावेश असताना लिव्हरपूलने प्रीमियर लीग, एफए चषक आणि लीग चषक या प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकल्या.
● तसेच दोन वेळच्या नेशन्स लीग विजेत्या पोर्तुगाल संघाचाही तो महत्त्वाचा सदस्य होता.
● आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने 49 सामन्यांत 14 गोल नोंदवले होते. त्याचा बंधू आंद्रे पोर्तुगालमधील पेनाफिएल क्लबकडून खेळायचा.