महिला एकेरीत कोको गॉफ विजेती
● अमेरिकेच्या कोको गॉफने एका सेटच्या पिछाडीनंतरही चमकदार कामगिरी करीत अग्रमानांकित अरिना सबालेन्काला ६-७ (५-७), ६-२, ६-४ असे नमवित फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे प्रथमच जेतेपद पटकावले.
● फ्रेंच स्पर्धेत 2013 नंतर पहिल्या दोन मानांकित खेळाडूंमध्ये अंतिम सामना झाला.
● अंतिम सामन्यात सबालेन्कावर मात करण्याची गॉफची ही दुसरी वेळ ठरली.
● यापूर्वी 2023 च्या अमेरिकन टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत तिने सबालेन्कालावर विजय मिळवला होता.
● वयाच्या 21 व्या वर्षी स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारी गॉफ अमेरिकेची सर्वात युवा विजेती ठरली.
● यापूर्वी हा विक्रम सेरेना विल्यम्सच्या (2002) नावावर होता.
● सेरेनाने 2015 मध्ये या स्पर्धेचे तिसरे विजेतेपद मिळविले होते. त्यानंतर ही स्पर्धा जिंकणारी गॉफ पहिली अमेरिकन टेनिसपटू ठरली.
● कारकीर्दीमधील गॉफचे हे फ्रेंच स्पर्धेतील पहिले, तर दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले.
● यापूर्वी 2023 मध्ये गॉफने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते.
● या वर्षातील गॉफचे हे पहिले विजेतेपद ठरले.