बँक ऑफ इंडियाचा लष्कराशी करार
- बँक ऑफ इंडियाने अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेले लष्करी कर्मचारी, माजी सैनिक आणि अग्निवीर यांना ‘बीओआय’ रक्षक वेतन देण्यासाठी भारतीय सैन्यासोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.
- या सामंजस्य करारात मोफत वैयक्तिक अपघात विमा, डेबिट आणि क्रेडिट कार्डवर आकर्षक ऑफर आदी विशेष फायद्यांचा समावेश आहे.
- नवी दिल्ली येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयात हा सामंजस्य करार झाला.
- भारतीय लष्कराचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव पुरी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
- बँकेची ही रक्षक वेतन योजना संरक्षण दल निमलष्करी दल आणि राज्य पोलीस दलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खास तयार केलेली वेतन योजना आहे.
- ती 100 लाख रुपयापर्यंतचे मोफत वैयक्तिक अपघाती विमा कव्हर, 200 लाख रुपयांचे मोफत हवाई अपघाती विमा कव्हर तसेच लागू अटी आणि शर्तीसह इतर अनेक विशेष अधिकार आणि सवलती देते