बुमरा वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू
- भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली.
- प्रतिष्ठेचे ‘सर गारफील्ड सोबर्स’ पदक मिळविणारा तो भारताचा एकूण पाचवा खेळाडू आणि पहिला वेगवान गोलंदाज ठरला.
- बुमराची 27 जानेवारी रोजी वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती.
- मागील वर्षी भारताने ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेत पटकावलेल्या विजेतेपदात बुमराची कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण ठरली होती.
- कसोटी क्रिकेटमध्येदेखील बुमराने एकहाती भारताला जागतिक अजिंक्यपद लढतीच्या उंबरठ्यापर्यंत नेऊन ठेवले होते.
- यापूर्वी भारताच्या राहुल द्रविड (2004), सचिन तेंडुलकर (2010), रविचंद्रन अश्विन (2016), विराट कोहली (2017, 2018) यांना हा सन्मान मिळाला आहे.
सारथी–कोकण कृषी विद्यापीठ सामंजस्य करार
- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था, पुणे (सारथी) यांच्यात ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आणि प्रशिक्षणासंदर्भात सामंजस्य करार झाला.
- विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आणि सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर सह्या करण्यात आल्या.
- ड्रोनसंबंधित डीजीसीए प्रमाणित ड्रोन पायलट प्रशिक्षण देऊन ड्रोनसंबंधित डीजीसीए प्रमाणित ड्रोन पायलट प्रशिक्षण देऊन शेतकरी, उद्योजक आणि रोजगार शोधणाऱ्या नवतरुणांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र प्राप्त करून देणे हा कराराचा मुख्य उद्देश आहे.
- त्यामुळे अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतलेल्या नवतरुण शेतकऱ्यांना कृषी व कृषीपूरक उद्योगांत नवीन संधी उपलब्ध होणार आहे.
माजी न्यायमूर्ती एस. राधाकृष्णन यांचे निधन
- मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ. एस. राधाकृष्णन यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले.
- राज्य घटना आणि प्रशासकीय कायद्यांशी संबंधित दिवाणी प्रकरणे न्यायमूर्ती राधाकृष्णन यांनी वकिली करत असताना प्रामुख्याने लढवली. त्यात त्यांचे विशेष प्रावीण्य होते.
- या प्रावीण्यामुळेच त्यांनी अल्पावधीत मुंबई उच्च न्यायालयात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली व पुढे डिसेंबर 1991 मध्ये त्यांना वरिष्ठ वकिलाचा दर्जाही देण्यात आला.
- 25 डिसेंबर 1946 रोजी जन्मलेल्या राधाकृष्णन यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले.
- 1971 मध्ये वकिली सुरू केली.
- राज्यघटना, दिवाणी, कामगार आणि फौजदारी कायदा यांसह विविध क्षेत्रात वकिली केली.
- राधाकृष्णन यांनी काही काळ अध्यापनाचे कामही केले होते.
‘डीपसीक’
‘डीपसीक‘ म्हणजे काय?
- ‘डीपसीक’ हा ‘एआय चॅटबॉट’ असून त्याची कार्यप्रणाली ‘चॅट-जीपीटी’ प्रमाणेच आहे.
- या चॅटबॉटला ‘आर वन’ या एआय मॉडेलचे पाठबळ असून त्याची गणन करण्याची, कोडिंगची आणि उत्तरे देण्याची क्षमता ‘ओपन एआय’च्या ‘ओ वन’ मॉडेलइतकीच आहे.
- एखाद्या समस्येवर मानवी मेंदू जसा काम करेल, त्याप्रमाणेच ‘आर वन’ हे मॉडेल काम करते.
- ‘डीपसीक’ मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
- ‘डीपसीक’ कंपनीची स्थापना लिआंग वेनफेंग यांनी डिसेंबर 2023 मध्ये केली. त्यानंतर मागील वर्षी या कंपनीने लँग्वेज मॉडेल प्रसिद्ध केले.
- लिआंग यांच्याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यांनी इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली आहे.
अमेरिकेला फटका
- ‘एआय’ तंत्रज्ञानात अमेरिकी कंपन्यांचा वरचष्मा आहे. त्याला प्रथमच धक्का बसल्याने अत्याधुनिक चिपनिर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या एनविदीयाच्या समभागांचे मूल्य कोसळले आहे.
- ‘एआय’ तंत्रज्ञानातील विकासासाठी प्रचंड खर्चाच्या चिप अत्यावश्यक असल्याचा समजही ‘डीपसीक’ने खोटा ठरविला आहे.
- त्यामुळे ‘एआय’ क्षेत्रात अमेरिकेच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला आहे.
अत्यंत कमी खर्च
- ‘चॅट-जीपीटी’च्या तुलनेत ‘डीपसीक’ तयार करण्यासाठी फारच कमी खर्च आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
- ‘चॅट-जीपीटी 4’ तयार करण्यासाठी ‘ओपन एआय’ला 10 कोटी डॉलरहून अधिक खर्च आल्याचा दावा या कंपनीचे सीईओ सॅम अल्टमन यांनी केला होता.
- त्यातुलनेत ‘डीपसीक’साठी केवळ 60 लाख डॉलर खर्च आल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
‘डीपसीक‘ची वैशिष्ट्ये:
- ‘ओपनएआय’चे ‘चॅट जीपीटी-4’ आणि ‘मेटा’चे ‘एलएलएएमए’ या मॉडेलपेक्षा ‘डीपसीक’ ने गणित, कोडिंग आणि तर्काच्या पातळीवर अधिक चांगली कामगिरी केल्याचा दावा करण्यात आला आहे.
- चॅट जीपीटी, गुगल जेमिनी यासारख्या मॉडेलप्रमाणेच डीपसीकसुद्धा ओपन सोर्स आहे. त्यामुळे जगभरातील डेव्हलपर्सना ते वापरासाठी खुले आहे. त्यामुळे किफायतशीर पद्धतीने अप तयार करता येतील.
- ‘ओपनएआय’ आपल्या अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेससाठी (एपीआय) पर मिलियन टोकनसाठी40 डॉलर आकारते, त्याच वेळी डीपसीक केवळ दहा सेंटमध्ये हे काम करते. त्यामुळे डेव्हलपर्ससाठी हा अत्यंत आकर्षक पर्याय ठरतो.