‘यूसीसी‘ लागू करणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य
- समान नागरी कायदा (UCC – Uniform Civil Code) लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
- मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी 27 जानेवारी रोजी ‘यूसीसी’ची अधिसूचना आणि त्याबाबतची नियमावली प्रसृत केली.
- त्यांनी विवाह, घटस्फोट आणि लिव्ह-इनच्या अनिवार्य नोंदणीसाठी पोर्टलचेही अनावरण केले.
- मुख्यमंत्री धामी यांचे निवासस्थान असलेल्या ‘मुख्य सेवक सदन’ येथील सभागृहात ‘यूसीसी’ अंमलबजावणीचा कार्यक्रम पार पडला.
- ‘सर्व धर्मातील प्रत्येक नागरिकासाठी समान कायदे निर्माण करणारी व्यवस्था पूर्णपणे अंमलात येत आहे.
- मार्च 2022 मध्ये धामी यांनी पुन्हा सरकार स्थापन करताच, त्यांच्या अध्यक्षतेखालील पहिल्याच बैठकीत राज्य मंत्रिमंडळाने ‘यूसीसी’ चा मसुदा तयार करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
- 27 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली.
- या समितीने दोन फेब्रुवारी 2024 रोजी समान नागरी संहितेचा मसुदा राज्य सरकारला सादर केला. त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी राज्य विधानसभेने विधेयक मंजूर केले होते.
- जवळपास एका महिन्यानंतर त्याला राष्ट्रपतींची संमती मिळाली आणि त्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला.
कायद्याची वैशिष्ट्ये काय?
- सर्व धर्मातील नागरिकांना ‘यूसीसी लागू’. बहुपत्नीत्व, बालविवाहास बंदी
- घटनेच्या कलम 342 आणि 366 (25) नुसार, निर्देशित अनुसूचित जमातींना ‘यूसीसी’ लागू नाही.
- सर्व नागरिकांच्या विवाह, घटस्फोट, वारसा, लिव्ह-इन आदींबाबत हक्कांचे संरक्षण
- विवाहानंतर 60 दिवसात त्याची नोंदणी करणे बंधनकारक.
बुमरा सर्वोत्तम कसोटीपट्टू
- भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि आघाडीची महिला फलंदाज स्मृती मनधाना यांना अनुक्रमे कसोटी आणि महिला एकदिवसीय क्रिकेटमधील वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळाला आहे.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
- 2018 मध्ये विराट कोहली नंतर हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला भारतीय कसोटी क्रिकेटपटू ठरला आहे.
- कोहलीपूर्वी माजी फिरकीपट्टू रविचंद्र अश्विनला 2016 मध्ये सर्वश्रेष्ठ कसोटी क्रिकेटपटू आणि वर्षातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले होते.
- तर दुसरीकडे सर्वोत्तम एकदिवसीय महिला क्रिकेटपटू ठरताना स्मृती मानधनाने यापूर्वी 2018 आणि 2022 मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू हा सन्मान मिळवला आहे.
ओडिशात डॉल्फिन गणना सुरू
- ओडिशाच्या वन,पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने गहिरमाथा सागरी अभयारण्यासह भितरकनिका राष्ट्रीय उद्यान व लगतच्या किनारी भागात डॉल्फिन गणनेला सुरूवात केली.
- ही गणना तीन दिवस सुरू राहील.
- वन्यजीव तज्ज्ञांच्या मदतीने तयार केलेली नऊ पथके डॉल्फिनची गणना करतील.
- प्रत्येक पथकात चार जणांचा समावेश आहे.
सतीश आळेकर यांना ‘जनस्थान‘ पुरस्कार
- साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा 2025 चा ‘जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे.
- नाशिक शहरातील ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’च्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण येत्या 10 मार्च रोजी होणार आहे.
- प्रतिष्ठानचे अध्यक्ष – वसंत डहाके
- कुसुमाग्रज यांच्या संकल्पनेतून 1991 पासून दरवर्ष आड जनस्थान हा पुरस्कार मराठी साहित्य क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या साहित्यिकास प्रदान केला जातो.
- यावर्षीचा 18 वा जनस्थान पुरस्कार पुण्यातील सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे.
- आळेकर यांचा जन्म 30 जानेवारी 1949 रोजी दिल्ली येथे झाला असून रंगभूमीवरील एक प्रभावशाली आणि प्रगतशील नाटककार म्हणून त्यांची ओळख आहे
- त्यांनी आजवर दहा नाटकांचे लेखन केले आहे. महापूर (1975), दुसरा सामना (1987) व एक दिवस माथाकडे (2012) या तीन नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.
- याशिवाय दीडशे एकांकिका व नऊ अनुवादित एकांकिका आणि नाटकांचे विपुल लेखन त्यांनी केले आहे.
- त्यांची महानिर्वाण (1974), अतिरेकी (1990), पिढीजात (2003), मिकी आणि मेमसाहेब (1973), बेगम बर्वे(1979) ही नाटके प्रसिद्ध आहेत.
- नाट्य लेखनासाठी त्यांना 1994 मध्ये संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय संगीत नृत्य आणि नाटक अकादमी तर्फे संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- जानेवारी 2012 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेआहे.
- एक लाख रुपये रोख स्मृतीचिन्ह व मानपत्र असे या जनस्थान पुरस्काराचे स्वरूप आहे.
38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
- पंतप्रधान डेहराडूनमध्ये 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करणार आहेत.
- उत्तराखंड राज्य स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षात या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.
- दि. 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी, 2025 दरम्यान उत्तराखंडच्या 8 जिल्ह्यांमधील 11 शहरांमध्ये या स्पर्धांतील खेळांचे आयोजन केले जाईल
- संकल्पना : ‘संकल्प से शिखर तक‘
- देवभूमी म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड आता क्रीडानगरी म्हणून सजले असून, येथे प्रथमच होत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून, ‘संकल्प से शिखर तक…’ हा नारा सार्थ ठरवण्यासाठी उत्तराखंड सज्ज झाले आहे.
- भारतीय ऑलिम्पिक स्पर्धेला 1924 मध्ये प्रारंभ झाला. पहिल्या तीन स्पर्धा लाहोरला झाल्या, त्यानंतर 1930 मध्ये ही स्पर्धा अलाहाबादला झाली.
- त्यानंतर या स्पर्धा विविध ठिकाणी होत गेल्या.
- सन 1940नंतर ही स्पर्धा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा म्हणून घेतली जाऊ लागली.
- ही स्पर्धा जेथे-जेथे झाली, तेथे-तेथे क्रीडासंस्कृती रुजण्यास मदतच झाली.