● ब्रेन ट्युमर दिन दरवर्षी 8 जून रोजी साजरा केला जातो. या दिवशी, जागतिक समुदाय ब्रेन ट्यूमर (brain tumor) बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांसाठी मदतीचे प्रयत्न करतो.
● या वर्षीची थीम (theme) आहे: “ब्रेन ट्यूमर: जागरूकता, निदान आणि उपचार” (Brain Tumor: Awareness, Diagnosis, and Treatment
वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे इतिहास
● वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे ची सुरुवात 2000 साली जर्मन ब्रेन ट्यूमर असोसिएशन यांनी केली.
● या ना-नफा संस्थेचा उद्देश मेंदूच्या ट्यूमरने ग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना आदरांजली वाहणे आणि जागरूकता वाढवणे हा होता.
● सुरुवातीला जर्मनीपुरता मर्यादित असलेला हा उपक्रम हळूहळू जागतिक स्तरावर पसरला.
● आता हा दिवस आंतरराष्ट्रीय ब्रेन ट्यूमर अलायन्स (IBTA) आणि इतर आरोग्य संस्थांच्या सहकार्याने जगभर साजरा केला जातो.
वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे उद्देश
● मेंदूचे ट्यूमर हे इतर कर्करोगांच्या तुलनेत कमी चर्चिले जाते. हा दिवस लोकांना लक्षणे आणि जोखीम याबद्दल जागरूक करतो.
● माहिती आणि समर्थन नेटवर्कद्वारे रुग्णांना त्यांच्या उपचार प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळते.
● मेंदूच्या ट्यूमरच्या उपचारांसाठी नवीन तंत्रज्ञान आणि औषधांचा शोध घेण्यासाठी निधी आणि समर्थन वाढवणे.
● रुग्ण, कुटुंब आणि वैद्यकीय व्यावसायिकांना एकत्र आणून समुदायाची भावना निर्माण करणे.