ओडिशातील सिमिलीपाल या व्याघ्रप्रकल्पात तब्बल दहा ‘मेलेनिस्टिक’ वाघांची नोंद करण्यात आली आहे. भारतातील हा एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे, ज्याठिकाणी देशातील सर्वच काळे म्हणजेच ‘मेलेनिस्टिक’ वाघ आहेत. जगभरातील एकूण 75% वाघ भारतात आहेत.
ठळक बाबी
• 2022 या वर्षातील व्याघ्रगणनेनुसार देशातील वाघांची संख्या 3,682 झाली आहे. यामध्ये 785 वाघांसह मध्यप्रदेश पहिल्या स्थानावर आहे तर 563 वाघांसह कर्नाटक दुसऱ्या, 560 वाघांसह उत्तराखंड तिसऱ्या आणि 444 वाघांसह महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे.
• ओडिशातील वाघांची संख्या वर उल्लेखलेल्या आकडेवारीत कुठेच दिसत नसली तरीही राज्यात असणाऱ्या एकमेव सिमिलिपाल या व्याघ्रप्रकल्पात एकूण 16 काळे वाघ म्हणजेच ‘मेलेनिस्टिक’ आहेत.
• या व्याघ्रप्रकल्पाला त्याच्या अनुवंशिक रचनेमुळे एक वेगळे ‘कन्झर्वेशन क्लस्टर’ म्हणून ओळखले जाते.
• गेल्या पाच वर्षांत सिमिलिपाल व्याघ्र प्रकल्पाला वन्यजीव संरक्षण, अधिवास व्यवस्थापन, मानव संसाधन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 32.75 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळाले आहे.
• बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस येथील पर्यावरणशास्त्रज्ञ उमा रामकृष्णन आणि त्यांचे विद्यार्थी विनय सागर यांच्या नेतृत्वाखाली 2021 मध्ये एक अभ्यास करण्यात आला.
• ‘ट्रान्समेम्ब्रेन एमिनोपेप्टिडेज क्यू’ या जनुकामुळे वाघाच्या शरीराच्या वरच्या भागाचा रंग गडद होतो.