मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत दक्षिण उज्जैन मतदार संघातून निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार मोहन यादव यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांनी त्यांना शपथ दिली.
अधिक माहिती
• जगदीश देवडा आणि राजेंद्र शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
• मोहन यादव हे मध्यप्रदेशचे 19 वे मुख्यमंत्री असून भारतीय जनता पक्षाचे 2023 पासूनचे चौथे ओबीसी समाजातील मुख्यमंत्री आहेत.
• याआधी भारतीय जनता पक्षाच्या उमा भारती, बाबुलाल गौड आणि शिवराजसिंह चौहान असे तीन ओबीसी मुख्यमंत्री झाले आहेत.
• मोहन यादव हे तब्बल तीन वेळा आमदार राहिलेले आहेत.
मोहन यादव यांची राजकीय कारकीर्द
• मोहन यादव यांना सुरुवातीपासूनच राजकारणात रस होता. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते.
• 2013 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि उज्जैन दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवली.
• 2013 च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत उज्जैन दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार जयसिंग दरबार यांचा 9652 मतांनी पराभव करून त्यांनी विजय मिळवला.
• 2018 च्या मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत ते उज्जैन दक्षिणसाठी आमदारकीची जागा घेऊन पुन्हा निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र वशिष्ठ राजू भैय्या यांच्यावर 18,960 मतांनी विजय मिळवला.
• 2020 मध्ये, त्यांनी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश सरकारचे कॅबिनेट सदस्य म्हणून शपथ घेतली. ते 2023 पर्यंत शिक्षणमंत्री होते.
• 2023 च्या मध्य प्रदेश राज्य विधानसभा निवडणुकीत ते उज्जैन दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढले आणि विजयी झाले.