राज्यांतील शाळांमध्ये निपुण महाराष्ट्र कार्यक्रम
- राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील दुसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्याचा विकास केला जाणार आहे.
- यासाठी येत्या 30 जूनपर्यंत शाळांमध्ये ‘निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम’ राबविला जाणार असल्याने शालेय शिक्षण विभाागाने याबाबतचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
- निपुण महाराष्ट्रअंतर्गत कृती कार्यक्रमात दुसरी ते पाचवीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
- या कार्यक्रमात वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांना 100 टक्के अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे.
- या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रथम भाषा व गणित विषयांसाठी ठरवून देण्यात आलेल्या अपेक्षित क्षमता प्राप्त होण्यासाठी उपयोजना केल्या जाणार आहेत.
- तसेच विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यांमधील अपेक्षित अध्ययन क्षमता किती प्रमाणात प्राप्त झाल्या, यासाठीची पडताळणी विभागामार्फत केली जाणार आहे.
- यामुळे विद्यार्थ्यांना पूर्ण क्षमतेने शिक्षण प्राप्त होण्यासाठी शालेय वेळेमध्ये संबंधित शिक्षकांना उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त वेळ आवश्यक असल्यास संबंधित शाळा मुख्याध्यापक यांच्या प्रयत्नाने तो घेता येईल, शिवाय सुट्ट्यांच्या कालावधीमध्येदेखील त्याची नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
- या कार्यक्रमाअंतर्गत चावडी वाचन व गणन अधिक कार्यक्रम सादर केले जातील.
- सुरुवातीला वर्गातील सर्व विद्यार्थी व अध्ययन करणारे शिक्षक यांची नोंदणी विद्या समीक्षक केंद्रच्या माध्यमातून मुख्याध्यापकांचीद्वारे ऑनलाइन स्वरूपात केली जाईल. ग्रामीण भागातील शाळांना या कृती कार्यक्रमासाठी लोकसहभाग घेता येईल.
- शाळांना प्रमाणपत्र
- निपुण महाराष्ट्र या कृती कार्यक्रमात ज्या शाळा सहभागी होणार नाहीत; अशा शाळांतील शिक्षकांकडे विशेष प्रशासकीय व अध्यात्मनात्मक लक्ष दिले जाणार आहे, तर दुसरीकडे ज्या शाळा शिक्षक दिलेल्या कालावधीत अपेक्षित उद्दिष्टे साध्य करतील, अशा शाळांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.