Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

वॉरेन बफे यांचा राजीनामा Warren Buffett’s resignation

Warren Buffett's resignation

● जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला पूर्णविराम देण्याची घोषणा केली.
● बर्कशायर हॅथवे या कंपनीच्या मुख्याधिकारी पदावरून या वर्षाच्या अखेरीस ते पायउतार होत असून, त्यांच्या पश्चात उपाध्यक्ष ग्रेग अॅबेल यांना त्यांनी
कंपनीची धुरा सोपवली आहे.
● बर्कशायरच्या प्रमुखपदी बफे हे तब्बल 60 वर्षे होते.
● या माध्यमातून त्यांनी जगभरात कीर्ती आणि गुंतवणुकीचे आदर्श स्थापित केले.
● अब्जाधीश असलेले बफे हे यशस्वी अमेरिकी नागरिकाचे उदाहरणही मानले जातात.
● अॅबेल ग्रेग हे 62 वर्षांचे असून, ते 2018 पासून बर्कशायरचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

1.16 लाख कोटी डॉलरचा प्रवास
● बर्कशायर ही आर्थिक संकटात असलेली वस्त्रोद्योगातील कंपनी बफे यांनी ताब्यात घेऊन 60 वर्षांत 1.16 लाख कोटी रुपयांवर पोहोचविली.
● विविध क्षेत्रात त्यांनी कंपनीचा व्यवसाय विस्तार केला.
● फोर्ब्स नियतकालिकाच्या माहितीनुसार, बफे याच्याकडे 168.2 अब्ज डॉलरची संपत्ती आहे.
● यातील बहुतांश संपत्ती ही बर्कशायरच्या समभागांच्या रुपाने त्यांच्याकडे आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *