Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

शुभमन गिलचे विक्रमी द्विशतक Shubman Gill’s record double century

Shubman Gill's record double century

● बर्मिंगहॅम येथील भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांत भारताच्या शुभमन गिलने द्विशतक झळकावले.
● कसोटी आणि वन-डेत द्विशतक करणारा गिल हा पाचवा फलंदाज ठरला. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि ख्रिस गेलने ही कामगिरी केली आहे.
● गिलने 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 208 धावा केल्या होत्या.
● मायदेशाबाहेरील कसोटीत भारतीय फलंदाजाने साकारलेल्या सर्वोच्च खेळींमध्ये शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर आहे.
● त्याआधी वीरेंद्र सेहवाग (309, मुलतान) आणि राहुल द्रविड (270, रावळपिंडी) यांचा क्रमांक लागतो.
● एजबेस्टन येथे द्विशतक ठोकणारा गिल हा तिसरा परदेशी फलंदाज ठरला.
● गिलच्या आधी ही कामगिरी ग्रॅमी स्मिथ (277 धावा, 2003) आणि झहीर अब्बास (274 धावा, 1971) यांनी केली आहे.
● कर्णधार म्हणून पहिल्या दोन 7 कसोटीत शतक ठोकणारा गिल हा सातवा फलंदाज ठरला. त्याच्यासह ही कामगिरी विजय हजारे, सुनील गावसकर, विराट कोहली, जॅकी मॅकग्लेव, अॅलिस्टर कुक, स्टीव्ह स्मिथ यांनी केली आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *