राष्ट्रीय बालिका दिन
- राष्ट्रीय बालिका दिन हा दरवर्षी 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस मुलींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी साजरा केला जातो.
राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यामागची कारणे:
- मुलींना त्यांच्या अधिकार आणि हक्कांविषयी माहिती मिळावी
- समाजात मुलींना भेडसावणारी असमानता, भेदभाव आणि शोषणाविषयी जनजागृती करावी
- मुलींना निरोगी आणि सुरक्षित वातावरण मिळावे
- मुलींच्या भविष्यातील संधी खुल्या असाव्यात
- समाजात मुलींना समान स्थान मिळावे
राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याची सुरुवात:
- महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि भारत सरकारने 2008 मध्ये या दिवसाची घोषणा केली होती
राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याची पद्धत:
- या दिवशी बालिका वाचवा, बाल लिंग गुणोत्तर, मुलींसाठी निरोगी आणि सुरक्षित वातावरणाची निर्मिती याविषयी जनजागृती मोहिमा आयोजित केल्या जातात
- थीम : उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचे सक्षमीकरण’
आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन
- शांतता आणि विकासाला चालना देण्यासाठी शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 24 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो.
- 24 जानेवारी, 2019 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला, जो सर्वसमावेशक आणि न्याय्य दर्जाच्या शिक्षणाला मूलभूत मानवी हक्क आणि शाश्वत विकासासाठी उत्प्रेरक म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण जागतिक उपक्रम म्हणून ओळखला गेला.
- 2025 मधील आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाची थीम : “एआय आणि शिक्षण: ऑटोमेशनच्या जगात मानवी एजन्सीचे संरक्षण“ आहे.
- ही थीम तांत्रिक प्रगती तीव्र होत असताना मानवी एजन्सी राखण्यावर लक्ष केंद्रित करताना शैक्षणिक संदर्भांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावातील वाढ कॅप्चर करते.
- एआय प्रणाली अत्याधुनिक होत असल्याने, अशा प्रणाली मानवी निर्णयांवर आणि शैक्षणिक क्रियाकलापांवर कसा परिणाम करू शकतात यावर मानव प्रश्न विचारू लागतात.
- या बदलांना प्रभावीपणे नेव्हिगेट करण्यासाठी आणि आकार देण्यासाठी शिक्षण व्यक्तींना कसे सुसज्ज करू शकते यावरील चर्चांना थीम प्रोत्साहन देते.
‘अनुजा‘ला ऑस्करचे नामांकन
- नवी दिल्लीतील जनजीवनावर आधारित ‘अनुजा’ लघुचित्रपटाला ‘ऑस्कर- 2025’साठी ‘लाइव्ह अॅक्शन शॉर्ट श्रेणी’ मध्ये नामांकन मिळाले आहे.
- अॅडम जे ग्रेव्हज आणि सुचित्रा मट्टई दिग्दर्शित ‘अनुजा’ ऑस्करमध्ये ‘अलीन’, ‘आय एम नॉट अ रोबोट’, ‘द लास्ट रेंजर’ आणि ‘द मॅन व्हू कांट रिमेन सायलेंट’ आदी लघुचित्रपटांशी स्पर्धा करणार आहे.
- ‘ऑस्कर’ची नामांकने बोवेन यांग आणि रॅचेल सेनॉट यांनी जाहीर केली.
‘संजय‘ : युद्धभूमी देखरेख प्रणाली
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 24 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथून ‘संजय – द बॅटलफिल्ड सर्व्हेलन्स सिस्टम ‘ (बीएसएस) या युद्धभूमी देखरेख प्रणालीचा प्रारंभ केला.
- संजय ही एक स्वयंचलित प्रणाली आहे जी सर्व जमिनीवरील तसेच हवाई युद्धभूमी सेन्सर्समधील माहिती एकत्रित करते, त्यांची सत्यता तपासून पाहण्यासाठी त्यावर प्रक्रिया करते, डुप्लिकेशन/ पुनरावृत्ति रोखते आणि सुरक्षित आर्मी डेटा नेटवर्क आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन नेटवर्कवर युद्धभूमीचे एक सर्वसाधारण देखरेख चित्र तयार करण्यासाठी त्यांचे एकत्रीकरण करते.
- यामुळे युद्धभूमीतील पारदर्शकता वाढेल आणि एका केंद्रीकृत वेब अॅप्लिकेशनद्वारे भविष्यातील युद्धभूमीचे संभाव्य रूपांतर देखील सादर केले जाईल जे कमांड आणि सेना मुख्यालय आणि भारतीय सैन्य निर्णय समर्थन प्रणालीला माहिती पुरवेल.
- बीएसएस अत्याधुनिक सेन्सर्स आणि अत्याधुनिक विश्लेषण सामग्रीने सुसज्ज आहे.
- ती विशाल भू-सीमांचे निरीक्षण करेल, घुसखोरी रोखेल, अचूकतेने परिस्थितीचे मूल्यांकन करेल आणि हेरगिरी , देखरेख आणि सर्वेक्षणासाठी उपयुक्त ठरेल.
- भारतीय लष्कराच्या ‘तंत्रज्ञान समावेशकता वर्ष’ च्या अनुषंगाने ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यासाठी ‘संजय’ हे एक अनुकूल परिसंस्था तयार करते.
- ‘संजय’ हे भारतीय लष्कर आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) यांनी स्वदेशी पद्धतीने संयुक्तपणे विकसित केले आहे.
- या प्रणाली भारतीय लष्कराच्या सर्व ऑपरेशनल ब्रिगेड, डिव्हिजन आणि कॉर्प्समध्ये तीन टप्प्यात मार्च ते ऑक्टोबर 2025 दरम्यान समाविष्ट केल्या जातील, ज्याला संरक्षण मंत्रालयाने ‘सुधारणांचे वर्ष’ म्हणून घोषित केले आहे.
- ही प्रणाली 2402 कोटी रुपये खर्चून बाय (इंडियन) श्रेणी अंतर्गत विकसित करण्यात आली आहे.
मोहनलाल हिरालाल यांचे निधन
- ‘आमच्या गावात आमचे सरकार’ हा नारा बुलंद करत गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा (लेखा) गावाला देशपातळीवर ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत मोहन हिराबाई हिरालाल यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले.
- महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेचे अनुयायी असलेले मोहनभाई यांनी सत्तरीच्या दशकात जयप्रकाश नारायण यांच्या ‘संपूर्ण क्रांती’ या आंदोलनाने प्रभावित होऊन त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले.
- 1984 मध्ये त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात ‘वृक्षमित्र’ संस्थेची स्थापना केली होती.