हायपरलूप चाचणी मार्ग विकसित
- ‘आयआयटी, मद्रास’च्या सहकार्याने आयआयटीच्या कॅम्पसमध्ये रेल्वेने देशातील पहिला हायपरलूप चाचणी मार्ग विकसित केला आहे.
- ही चाचणी खरे तर महाराष्ट्रात झाली असती. देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात 2016 मध्येच या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने तो प्रकल्प रद्द केला.
‘हायपरलूप‘ म्हणजे काय?
- हायपरलूप ही विद्युतचुंबकीय ऊर्जेवर धावणारी छोटी गाडी (पॉड) असते. ती ताशी एक हजार किलोमीटरपर्यंतचा वेग गाठू शकते.
- ही गाडी एका निर्वात पाइपमधून प्रवास करते. त्यामुळे अतिवेगवान, विनाअडथळा प्रवास शक्य होतो.
- हायपरलूपसाठी वीजही कमी लागते
- ही गाडी धावत असताना प्रत्यक्ष ट्रॅकपासून काही उंचीवर हवेत चालते. त्यामुळे प्रतिरोध कमी होतो.
चाचणी ट्रॅक कसा आहे?
- रेल्वे, आयआयटी, मद्रास, लार्सन अँड टूब्रो, आर्सेलर मित्तल यांनी एकत्रितपणे हा ट्रॅक विकसित केला आहे.
- त्यावर धावणाऱ्या पॉडला गरुड वाहन असे नाव देण्यात आले आहे.
- हे छोटे ट्रॅक्टरसारखे प्रतिरूप आहे.
- हायपरलूपला प्रवासाचे पाचवे साधन म्हटले जाते
- याची संकल्पना ‘टेस्ला’चे प्रमुख एलन मस्क यांनी 2013 मध्ये मांडली
- अमेरिकेत व्हर्जिन अटलांटिक नावाच्या कंपनीने चाचणी घेतली
- मात्र, तेथेही ती प्रायोगिक पातळीवरच
वैशिष्ट्य
- भारतातील चाचणी ट्रॅकची लांबी- 422 मीटर
- चाचणीतील पॉडचा कमाल वेग – 150
- क्षमतेच्या विद्युत प्रवाहावर चालणार पॉड- 650 व्होल्ट
- पॉडचे एकूण वजन – 1.2 टन