28 फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन
- राष्ट्रीय विज्ञान दिवस’ दरवर्षी 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो.
- हा दिवस भारतात विज्ञानाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रातील योगदान करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा हा दिवस आहे.
- 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी ‘रमन प्रभाव’ (Raman Effect) शोधला.
- हा शोध त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळवून देणारा ठरला. या पुरस्कार प्राप्तीनंतर भारताचे विज्ञानाविषयातील नाव जगभरात पोहोचले.
- ‘रमन प्रभाव’ म्हणजे प्रकाशाच्या कणांचा पदार्थाच्या अणूंसोबत संवाद साधून प्रकाशाच्या लहरींच्या रंगांमध्ये होणारा बदल.
- या ऐतिहासिक शोधामुळे भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली, आणि भारतीय विज्ञानाला एक मान्यता प्राप्त झाली.
- राष्ट्रीय विज्ञान दिवस हा दिवस विज्ञानाचे महत्त्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आहे.
- विज्ञानाने आपल्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडवून आणला आहे आणि प्रत्येक क्षेत्रात नवीन संशोधनामुळे प्रगती होत आहे.
- विज्ञानाची गोडी लावून नवीन संशोधनाची निर्मिती करणे, नवीन संशोधन उदयास येणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.
- 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी सी. व्ही. रामन यांच्या शोधाचे महत्त्व आणि त्यांच्या योगदानाचे सन्मान केले जाते. त्यांच्या ‘रमन प्रभाव’च्या शोधामुळे भारताला एक वैज्ञानिक शक्ती म्हणून ओळख मिळाली.
थीम
- राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दरवर्षी एका थीमवर काम केले जाते.
- 2025 साठी राष्ट्रीय विज्ञान दिवसाची थीम आहे, “विकसित भारतासाठी विज्ञान आणि नवोन्मेषामध्ये जागतिक नेतृत्वासाठी भारतीय तरुणांना सशक्त करणे“. या थीमवर वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर या थीम आधारित संशोधन करणे. तसेच नवतरुणांना अधिक संधी देणे हा त्यामागील उद्देश आहे.