Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

31 मे : जागतिक तंबाखू विरोधी दिन

  • Home
  • Current Affairs
  • 31 मे : जागतिक तंबाखू विरोधी दिन

31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन (World No Tobacco Day) साजरा केला जातो.

थीम:-

“आम्हाला अन्न हवे आहे, तंबाखू नाही” (2023)

तंबाखू: आपल्या पर्यावरणाला धोका” (2022)

काय आहे इतिहास?

खरे तर तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने 1987 मध्ये तंबाखू निषेध दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या वर्षी म्हणजे 1988 मध्ये पहिल्यांदा जागतिक तंबाखू विरोधी दिन एप्रिल महिन्यात साजरा करण्यात आला. मात्र, नंतर तो साजरा करण्यासाठी मे महिन्यात तारीख निश्चित करण्यात आली.

तंबाखू निषेध दिवस कधी साजरा केला जातो?

दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो.

1988 मध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी तो साजरा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून तंबाखूचे सेवन थांबवण्यासाठी आणि त्यामुळे होणाऱ्या समस्यांची जाणीव करून देण्यासाठी साजरा करण्यात आला.

तंबाखूच्या सेवनामुळे आजार होण्याचा धोका

तज्ज्ञांच्या मते, तंबाखूच्या सेवनामुळे अनेक गंभीर आणि जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो. फुफ्फुसाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. याशिवाय हृदयविकार आणि इरेक्टाइल डिसफंक्शनसारखे आजारही होऊ शकतात.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *