Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

8 मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन International Women’s Day

March 8: International Women's Day

8 मार्चआंतरराष्ट्रीय महिला दिन

 

  • दरवर्षी 8 मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो.
  • हा दिवस महिलांच्या समान हक्कांना आणि समानतेला प्रोत्साहन देतो. त्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकतो.
  • हा दिवस महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

इतिहास

  • आंतरराष्ट्रीय महिला दिन (IWD) हा कामगार महिलांच्या हक्कांसाठी झालेल्या चळवळीतून निर्माण झाला.
  • 1908 मध्ये 15,000 महिलांनी कामाचे तास कमी व्हावेत, चांगलं वेतन मिळावं आणि मतदानाचा हक्क मिळावा या मागण्यांसाठी न्यूयॉर्क शहरात एक मोर्चा काढला होता.
  • वर्षभरानंतर अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीनं लगेचच पुढच्या वर्षी हा दिवस ‘राष्ट्रीय महिला दिन’ म्हणून घोषित केला.
  • त्यानंतर क्लारा झेटकिन यांनी 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात केली. क्लारा झेटकिन या जर्मन कम्युनिस्ट आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या होत्या.
  • 1910 मध्ये कोपेनहेगन येथे झालेल्या कामगार महिलांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत (इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ वर्किंग वुमेन) त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
  • या परिषदेत उपस्थित असलेल्या 17 देशांतील 100 महिलांनी एकमतानं त्यांना जोरदार पाठिंबा दिला.
  • ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड मध्ये 1911 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.
  • 1977 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं देखील त्याला अधिकृत मान्यता दिली. 1911 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं स्वीकारलेली पहिली थीम ही ‘भूतकाळाचं सेलिब्रेशन,भविष्याचं नियोजन’ अशी होती.
  • 1917 मध्ये युद्धकालीन संपात रशियन स्त्रियांनी “ब्रेड आणि शांती” ची मागणी केल्यानंतर 8 मार्च या तारीखेची निवड करण्यात आली.
  • संपाच्या चार दिवसांनंतर झारला सत्ता सोडावी लागली आणि तात्पुरत्या सरकारनं महिलांना मतदानाचा अधिकार दिला.
  • त्यावेळी रशियात वापरात असलेल्या ज्युलियन कॅलेंडरनुसार 23 फेब्रुवारीपासून महिलांचा संप सुरू झाला. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ती तारीख 8 मार्च आहे.

भारतात पहिल्यांदा महिला कधी साजरा केला गेला?

  • भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला.
  • 8 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता.
  • पुढे 1975 हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.
  • बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या.
  • 1975या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले.
  • या वर्षी, आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 ची थीम ॅक्सिलरेट अॅक्शन आहे, जी महिलांच्या प्रगतीवर सकारात्मक परिणाम करणाऱ्या धोरणे, संसाधने आणि क्रियाकलापांना ओळखण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी जागतिक आवाहन आहे.

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *